Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी 5 मोठ्या घटनांनी उत्तर प्रदेशातील अनेक लोकसभा जागांचे समीकरण बदललं आहे. ज्या जागांवर समीकरण बदलले किंवा बदलत आहे असे वाटते, त्यात कौशांबी, रायबरेली आणि जौनपूर मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात यूपीतील 14 जागांवर मतदान होत आहे.  2019 मध्ये इंडिया आघाडीमधील पक्षांनी  या 14 जागांपैकी फक्त एक जागा जिंकली होती. मात्र, आता नव्या समीकरणांमध्ये इंडिया आघाडीला किमान 3 जागांवर फायदा होताना दिसत आहे.


पाचव्या टप्प्यात कुठे होणार मतदान?


पाचव्या टप्प्यात रायबरेली, अमेठी, मोहनलालगंज, बाराबंकी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, झांसी, लखनौ, जालौन, गोड्डा, कैसरगंज, कौशांबी आणि फैजाबाद या जागांवर निवडणूक होणार आहे. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने रायबरेली वगळता सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी मतदानापूर्वी घडलेल्या पाच मोठ्या राजकीय घटनांमुळे पक्षाला धक्का बसला आहे.


या 5 घटनांचा परिणाम मतदानावर झाला तर अनेक जागांची गणिते बिघडू शकतात.


1. राजा भैय्या यांची निवडणुकीत तटस्थ राहण्याची घोषणा


कुंडा आमदार आणि जनसत्ता दल (लोकशाही) प्रमुख राजा भैया यांनी लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे. राजा भैय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार ते निवडणूक लढवत नाहीत आणि कोणाशीही युती नाही, त्यामुळे आम्ही समर्थकांना त्यांना वाटेल त्याला मतदान करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी आणि प्रतापगड लोकसभा जागांवर राजा भैय्या यांचे वर्चस्व आहे. कौशांबी लोकसभेच्या 5 पैकी 2 विधानसभा जागांवर जनसत्ता दलाचे आमदार आहेत. 2022 च्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार कौशांबी जागेवर भाजपला सुमारे 2 लाख 75 हजार मते मिळाली होती. तर सपाला सर्व विधानसभांमध्ये मिळून 4 लाख 30 हजार मते मिळाली होती. जनसत्ता दलाला सुमारे दोन लाख मते मिळाली.


2. धनंजय सिंह आणि केशवदेव मौर्य यांचा यू-टर्न


उमेदवारीपूर्वी भारतीय जनता पक्षाविरोधात आघाडी उघडणारे माजी खासदार धनंजय सिंह यांनी यू-टर्न घेतला आहे. जौनपूर येथील सभेत धनंजय सिंह यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. धनंजय सिंह यांच्या पत्नीनेही येथून बसपाच्या चिन्हावर उमेदवारी दाखल केली होती, मात्र अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. धनंजय सिंह यांच्याप्रमाणेच महान दलाचे केशवदेव मौर्य यांनीही यू-टर्न घेतला आहे. आतापर्यंत मौर्य येथे सपाला पाठिंबा देत होते, मात्र अखेर त्यांनी पाठिंबा काढून घेतला आहे.


3. राहुल गांधींच्या पीएम दाव्यावर अखिलेशचं मौन


पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांनी लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अखिलेश यांना राहुल यांच्या पीएम दाव्याबाबत प्रश्न विचारला असता अखिलेश यांनी तो प्रश्न टाळला. राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान म्हणून दाखवण्यात काँग्रेस कार्यकर्ते सतत व्यस्त आहेत. काँग्रेससाठी यूपीमधील निवडणुकीचा पाचवा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे. या टप्प्यात पक्ष लोकसभेच्या 4 जागांवर निवडणूक लढवत आहे. यामध्ये रायबरेली, अमेठी, बाराबंकी आणि झाशीचा समावेश आहे.


4. सोनिया गांधी रायबरेलीच्या मैदानात


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोनिया गांधी पहिल्यांदाच रिंगणात उतरल्या. रायबरेलीत राहुलला मतदान करण्याचे आवाहन सोनिया यांनी जनतेला केले. रॅलीला संबोधित करताना सोनिया म्हणाल्या की, मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे आणि राहुल तुम्हाला निराश करणार नाही. रायबरेली ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते आणि 2004 पासून सोनिया स्वतः इथल्या खासदार आहेत.


5. सपा आमदार मनोज पांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश


पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वी रायबरेलीच्या उंचाहार मतदारसंघातील सपा आमदार मनोज पांडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अमित शाह यांनी एका सभेत त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. पांडे यांच्या समर्थकांनीही शक्तीप्रदर्शन केले.मनोज पांडे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सपाविरोधात बंडखोरी केली होती, मात्र रायबरेलीतून तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. नुकतेच अमित शाह यांनी पांडे यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर केली होती. पांडे 2012 पासून रायबरेलीच्या उंचाहार मतदारसंघाचे आमदार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या