मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केलेल्या नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.   उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS)  संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.  आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार,  असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत.  


उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल 
मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल.  पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100  =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील .


संघाला तुम्ही नष्ट करायला निघालेत : उद्धव ठाकरे


 जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत . नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.   


अर्धवट राम मंदिराचे काम आम्ही पूर्ण करू: उद्धव ठाकरे 


उद्धव ठाकरे म्हणाले, जे लोक त्यांचा सोबत काल मंचवर होते. त्यांनी आधी दिशा ठरवावी. ते भटकत आहेत. नकली संतान मला म्हणतात मी त्यांना बेअकली म्हणतो. आमचे सरकार आल्यावर आम्ही राम मंदिरवर बुलडोजर चालवणार नाही तर आम्ही त्यांनी जे अर्धवट काम केले ते राम मंदिराचे  पूर्ण करणार आहे. 


पंतप्रधान हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत :  उद्धव ठाकरे


4 जूनला जुमला पर्व संपत आहे. 4 जूनला अच्छे दिनला सुरुवात होईल. शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग होतं आहे. महाराष्ट्रला हे बदनाम करत आहेत. मुंबईची लूट करून गुजरातला सगळं घेऊन जायचं त्यांना करायचे आहे. मुंबई आणि महाराष्ट्रचा वैभव आम्ही परत आणून. घटनाबाह्य सरकारच्या सोबत पंतप्रधान हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत, अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग होतोय : उद्धव ठाकरे 


शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग होतं आहे. जिथे जिथे आमच्या लक्षात येतय तिथे आम्ही तक्रार केली आहे.  मुंबईत नाही पण बाहेर मतदान जिथे होताय तिथे मतदान न करणांऱ्याच्या बोटाला सुद्धा शाई लावली जात आहे हे गंभीर आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. 


Video :