Uttam Jankar will Joins Sharad Pawar's NCP, Devendra Fadnavis and Sharad Pawar : माढा लोकसभेत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. माढा लोकसभेत चुरस वाढली असताना जानकरांची भूमिका महत्वाची मानली जात होती. दरम्यान उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबिय एकत्र येणार असल्याची माहिती आहे.  वेळापूरमध्ये जानकरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळेत जानकर आपली भूमिका स्पष्ट करतील. 


उत्तम जानकरांचे जयसिंह मोहितेंना जेवणाचे निमंत्रण


उत्तम जानकर यांनी महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. जानकरांची मोहिते पाटलांसोबत डिनर डिप्लोमसी चर्चेचा विषय ठरली आहे. जानकरांच्या मेळाव्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जानकरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. जानकरांच्या एंट्रीने माढा लोकसभेचे संपूर्ण समीकरच बदलून जाणार आहे. 


फडणवीसांची विमानसेवा निष्फळ 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना गळाला लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांच्याशी बैठक करण्यासाठी त्यांनी बारामतीला खास विमानही पाठवले होते. मात्र, फडणवीसांची विमानसेवा पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना आमदारकीचे आश्वासन दिले होते. मात्र, जानकरांनी फडणवीसांची ऑफर धुडकावून लावली आहे. त्यामुळे मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांना आपल्या बाजूने वळवण्यास जवळपास यश आले आहे.  
मोहिते पाटील गेले आता आपल्याला रान मोकळं आहे. तुम्हाला विधानपरिषदेवर पाठवू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना आमदारकीचे आश्वास दिले होते. मात्र, जानकर यांनी मोहिते पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. 


माढ्याचे समीकरण कसे बदलणार?


उत्तम जानकर मोहिते पाटील यांच्यासोबत असल्याने माढ्याचे संपूर्ण समीकरणच बदलून गेले आहे. कारण जानकर आमच्यासोबत राहिले तर आम्ही माळशिरस तालुक्यातून 1 लाख 30 हजार मतांचा लीड घेऊ, असा दावा जयसिंह मोहिते पाटील यांनी केला होता. आता दोन्ही गट एकत्र आल्याने मोहिते पाटील लोकसभा लढवू शकतात. तर उत्तम जानकर यांना मोहिते पाटील विधानसभेला मदत करु शकतात. त्यामुळे कट्टर विरोधक असलेले मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलंय, पुढच्या दोन महिन्यांनी तुम्हाला शिंदे दिसणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा