Rahul Gandhi and Uddhav Thackeray, Solapur : ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पाच जानेवारीला तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) 10 जानेवारीला भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती. दरम्यान प्रशासनाने त्यांची ही तयारी हाणून पडली. त्यानंतर मारकवाडी हे गाव देशभर चर्चेत आले. यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिली होती.
दरम्यान शरद पवार यांनी देखील मारकडवाडीला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता येत्या पाच जानेवारीला उद्धव ठाकरे तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियांका गांधी व अरविंद केजरीवाल हे मारकडवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी व मतदारांशी ईव्हीएम मशीन विषयी चर्चा करणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले. यावेळी मस्साजोग प्रकरणावर बोलताना जानकर यांनी बीड जिल्ह्यातील त्या आकाने 32 खून केल्याचा खळबळजनक आरोप केला . बीड जिल्ह्यात असे कित्येक आकाश असून येथील परिस्थिती अफगाणिस्तानच्या कंधार पेक्षाही भीषण असल्याचे आरोप केले.
संतोष देशमुख यांच्या शरिरात साडेतीन लीटर रक्त साकळलं होतं, हे आम्ही सिनेमात सुद्धा पाहिलं नाही - जानकर
उत्तम जानकर म्हणाले, संतोष देशमुख यांच्या शरिरात साडेतीन लीटर रक्त साकळलं होतं. हे आम्ही सिनेमात सुद्धा पाहिलं नाही. असे हजारो आका या बीड शहरात आहेत. हे राज्य साडेसात वर्ष चालवत आहेत. हे गुंड सरकारी आश्रय असल्याशिवाय एवढं करु शकत नाहीत. कोणाचा पाय तोडला तर संध्याकाळ पर्यंत मिटवून घे.. त्याला 50 हजार रुपये दे, असे प्रकार सुरु असतात. हा धंदा राज्यभर सुरु आहे. फक्त बीडमध्ये नाही. तुम्हाला आज 25 टक्के मतं आहेत. उद्या त्यातील निम्मी सुद्धा राहणार नाहीत. ईव्हीएम सुद्धा चालणार नाही. म्हणून वेळेत जागे व्हा. हे राज्य तुम्हाला कुठे न्यायचे हे ठरवा, असंही जानकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर 20 हजार बोनस देणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा