मुंबई उद्धव  ठाकरेंना (Uddhav Thackeray)  शिवसेना (Shiv Sena)  'उबाठा' पक्षावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न केला. यावर ठाकरे चांगलेच भडकल्याचे दिसून आले आहेत. उबाठा काय आहे, माझं स्पष्ट आणि स्वच्छ नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे,  हे उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खडसावले आहे. सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांनी पुनरुच्चार केल आहे.  माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे,‘एसंशिं…' आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले, 


उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांची  शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे. ए सं शिंदे त्याचा फुलफॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ? 


महाराष्ट्राशीही तुम्ही गद्दारी केलीत, राजकारणातल्या आईशी हरामखोरपणा केला, उद्धव ठाकरे कडाडले


मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे स्वत:ला खरी शिवसेना म्हणाऱ्या  राजकर्त्यांकडून होताना दिसत नाही, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  जनता सगळे उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्याचाच तर राग जनतेला आलाय. म्हणजे एकतर तुम्ही गद्दारी करून राजकारणातल्या आईशी हरामखोरपणा केलात, शिवसेनेशी गद्दारी केलीत. राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवर तर तुम्ही वार केलाच; पण महाराष्ट्राशीही तुम्ही गद्दारी केलीत. ती महाराष्ट्रात चालणार नाही.  


  मराठी माणसं कधीही कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाहीत : उद्धव ठाकरे


गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं, या विषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  मराठी माणसं या पद्धतीने कधीही कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाहीत; पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडतंय? आणि त्यांना म्हणजेच मराठी द्वेष्ट्यांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न आहे. मराठी माणूस दाखवेल नं त्यांना काय दाखवायचंच ते! पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा… कोरोना काळामध्ये आपण जे काम केलं, ते हे लोक कधीच विसरलेले नाहीयेत. मी जात व प्रांतभेद केला नाही.हाच तर निकाल आता या वेळच्या निवडणुकीत लागणार आहे. 


Uddhav Thackeray Interview :