Uddhav Thackeray, Nashik Meeting : "मोदींनी काल महाराजांचा जिरेटोप घातला, आज गांधीटोपी घातली. रोज टोप्या बदलणारा माणूस पंतप्रधान पाहिजे तुम्हाला? प्रफुल्ल पटेलांना सांगतोय. पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. जिरेटोप तुम्ही मोदींच्या डोक्यावर ठेवता त्यांची महाराजांची बरोबरी करण्याएवठी पात्रता आहे का?", असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकमधील सभेत केला. नाशिकचे (Nashik) महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सभा घेतली यावेळी ते बोलत होते. 


महाराजांच्या टोपाची हात लावायची सोडा, दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही


उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांना दैवत मानतो. त्यांचं राज्य कसं चालतं होतं? कोणी महिलेवर अत्याचार केला तर त्याचे हातपाय तोडले जात होते. मोदी काय करतात? मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली सर्वांना माहिती आहे. तिथे जाण्याची हिंमत नाही. ना मोदींची हिंमत आहे ना शाहांची... मोदीची तुमची महाराजांच्या टोपाची हात लावायची सोडा, दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही. मोदी प्रचार कोणाचा प्रचार करतात, त्याचे व्हिडीओ फिरतात. असा ज्यांचा उमेदवार आहे, तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 


मोदीजी मी तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट मागितलेले नाही


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही गोष्टी आवर्जुन बोलणे महत्वाचे आहे. आज मोदीजी नाशिकमध्ये होते. आता मला खरंच वाटतय, त्यांच्या मनावर ताण पडलाय. कोणीतरी मला सांगितलं की ते झोपतच नाहीत. झोप पूर्ण झाली नाही तर मेंदूवर परिणाम होतो, असं डॉक्टर सांगतात आणि लोक भ्रमिष्टासारखे बोलू लागतात. मोदीजी कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. स्वत: हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तरी देखील पावटे आपल्या शिवसेनेना नकली शिवसेना म्हणत आहेत. तेलंगणाची निवडणूक आणि तिथे मला मोदी नकली संताण म्हणाले. मोदीजी मी तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट मागितलेले नाही आणि तेवढी तुमची लायकी देखील नाही. तुम्ही ब्रम्हदेवाचा अवतार बिलकुल नाहीत. 


संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे, तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना घाबरतात


चोराच्या हातात धनुष्यबाण दिला पण मशाल कशी पेटली आहे पाहा. संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे, तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना घाबरतात. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान आणि आपल्याकडेचे गद्दार सोबत घ्यावे लागले. 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल. ही सगळी नकली संतानं. कारण मोदीजी तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल; उद्धव ठाकरेंचा सवाल