Sushma Andhare on Raj Thackeray : "लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची तयारी माझी नाही. मी कनिष्ठ मध्यमवर्गी आहे. कोणत्याही जाती धर्मात न गुंतता, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची लढाई शिवसेनेला लढायची होती, त्यासाठी शिवसेना कटिबद्धपणे काम करत आहे. त्यामुळे विधानसभा माझ्या डोक्यात नाही. लोकसभेला ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 'एबीपी माझ्या'च्या तोंडी परिक्षेत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या बोलत होत्या. 


तसा पुरुषाचा विनयभंग होतं नसेल का?


पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जसा बाईचा विनयभंग होतो, तसा पुरुषाचा विनयभंग होतं नसेल का? शील चारित्र्य बलात्कार विनयभंग या सगळ्या संकल्पना केवळ बायकांसाठी असतात का? त्या पुरुषांसाठी नसतात का? जेव्हा नवनीत राणा म्हणतात की, उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा? जेव्हा एखाद्या वेळेला एखादी गोष्ट चूक वाटण फार स्वाभाविक आहे. परंतु एव्हरी अॅक्शन हॅज इक्वल रिअॅक्शन असं असतं. नवनीत राणा म्हणजे चाराणे की मुर्गी आणि बाराणे का मसाला अशा आहेत. निलम गोऱ्हे माणसं अजिबात जोडत नाहीत. त्यांच्याकडून संघटन बांधणी शून्य झाली. त्या मॉडेल कॉलनी शिवाजीनगर या भागात राहत होत्या. तिथे एक शाखा उभी केली नाही. एक नगरसेवक निवडून आणला नाही. 20 वर्ष आमदारकी त्याचा काहीच उपयोग केला नाही, असंही अंधारे यांनी स्पष्ट केलं.  


भाजपाच्या विचारांनी प्रभावित झाली होती


अंधारे म्हणाल्या, भाजपच्या संगतीला राहिलेली जी शिवसेना होती, ती भाजपाच्या विचारांनी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेली आहे. भरत गोगावले ज्या भागात आहेत, त्यांची चांगली कनेक्टिव्हिटी आहे. बाकीच्यांचं तसं काहीच नाही. वाचणाऱ्या आणि वाचून बोलणाऱ्यांची कमतरता जाणवते. अभ्यासूपणे बोलणाऱ्यांची देखील काम जाणवते. पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, मला महिला राजकारणी म्हणून निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि नवनीत राणा यांच्यापैकी कोणीही आवडत नाहीत. त्या माझा विरोध असलेल्या पक्षात आहेत म्हणून नाही तर मला सुषमा स्वराज प्रचंड आवडत होत्या. मला इंदिरा गांधींची निर्णय क्षमता आवडायची. पण मला वरिलपैकी मनिषा कायंदे आवडतील. त्यांच्यामध्ये भाबडेपणा आणि निर्दोषपणा आहे. कायंदे धुर्त आणि कपटी अजिबात नाहीत. हे खात्रीने सांगू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या 


ज्याला रुमणं, कुळवं, दांडा, खुरपणं माहिती नाही, अशी माणसं कृषीमंत्री होतात, सुषमा अंधारे तोंडी परिक्षेत काय म्हणाल्या?