Uddhav Thackeray on Narayan Rane, रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  "आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे. त्या म्हणी मी केल्या नाहीत किंवा तुम्ही केल्या नाहीत. पण एक म्हण अशी आहे की, शुभ बोल रे नाऱ्या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाला. मी येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. दोन तीन वेळेस तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात तिकडे उभारला तिकडे साफ करुन टाकला. लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो", अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केली. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची कोकणात सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. 


शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली नाहीतर दुसरे काय असणार? 


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले,  चार दिवसांपूर्वी येऊन गेलो  होतो. म्हटलं आता काय बोलायचं, पण आपल्याला नकली  म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे नेते पचकून गेले. बेअकली जनता पार्टी आहे. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली नाहीतर दुसरे काय असणार? आज पर्यंत त्यांना मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो. काही लाज वाटत नाही. कमळाबाई म्हणत होतो आणि आता बेअकली म्हणतो. 


तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला


पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. कोंबडीचोर बरोबर घेतलाय तरी अंडी काही बाहेर येत नाहीयेत, त्यावर बोला. तुमच्या पेक्षा कोंबडं बरं. राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. हिंदूह्रदय सम्राट म्हणा नाहीतर तुमची जिफ सरळ करता येते. मी राम मंदिरात जाऊन आलो. तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाहीत? असा सवालही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on Narendra Modi : गॅस सिलेंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेलाय, मोदींचा पराभव करण्याची आपली जबाबदारी, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल