Uddhav Thackeray on Narendra Modi : "मोदींना (Narendra Modi)  मत म्हणजे विनाशाला मत आहे. कितीकाळ यांना सहन करणार आहात. यांना महाराष्ट्राबद्दलचा आकस टोकाला पोहोचला आहे. काँग्रेसला 60 वर्षात कमावता आले नाही ते मोदींनी (Narendra Modi) निवडणूक रोख्यातून 10 हजार कोटी लुबाडले", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. कोकणात विनायक राऊत यांच्या प्रचारात ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.  


उद्धव ठाकरे म्हणाले, कोकण हे शिवसेनेचे आणि ठाकरे कुटुंबियांचे ह्रदय आहे. शिवसेनेचा फोडण्याचा प्रयत्न झाला तरी भास्कर, राजन, वैभव आमच्यासोबत आहेत. तुमचा मला अभिमान आहे. वर्षानुवर्षे जपलेला धनुष्यबाण कोकणातून गायब करुन टाकला. गद्दारांना समजलं नाही की, त्यांच्या मालकांनी शिवसेनेचे कोकणाशी असलेलं नातं संपवण्याचा प्रयत्न केलाय. कोकणात शिवसेना उभी राहिली नसती, तर कोकणात गुंडाराज चालला असता. उघडपणे सांगतात की, यांना मत म्हणजे त्यांना मत. आज जुलूम जबरदस्तीने काम करु इच्छित आहेत. 


एकेला सबपे भारी, आगे पिछे सब भ्रष्ट्राचारी


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींना काही सूरच लागत नाही. सध्या झालय असं की, आयपीएलचे दिवस सुरु आहेत. त्यामध्ये असं होतं की आपल्याकडे होता आता तिकडं गेला. मोदींचा आत्मविश्वास आता राहिला नाही. 2014 आणि 2019 ला जो आत्मविश्वास होता, तो आता राहिलेला नाही. एक एकेला सबपे भारी, आगे पिछे सब भ्रष्ट्राचारी अशी यांची अवस्था आहे. यांच्याकडे पाहून अटलजींचा आत्मा रडत असेल. शिवसेना सोबत होती, तेव्हा यांना महाराष्ट्रात किती वेळा यावे लागत होत? कुठून यांना अवदासा सुचली, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.  


भाजपने त्यांच्या कुवतीप्रमाणे दिलय


अबकी बार भाजप तडीपार आहे. यांना तडीपार करुन टाका. भाजपला निर्यात करुन टाका. यांना सातासमुद्रापार पाठवून द्या. यांनी शिवसेना चोरली. राणे कुटुंबिय जिकडे सत्ता असते, तिकडे झुकतात. भाजपने त्यांच्या कुवतीप्रमाणे दिलय. लघू आणि सुक्ष्म दिलय. कोकणसाठी यांनी काय केलं? शिवसेना प्रमुखांची घराणेशाही यांना चालत नाही,पण यांना गद्दारांची आणि गुंडांची घराणेशाही चालते, असंही ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Rohit Patil on Narendra Modi : मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला, रोहित पाटलांची टीका