Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे महायुतीत (Mahayuti) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांची नाशिकमध्ये प्रचाराची सभादेखील पूर्ण झाली आहे. 


राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) हे दोन्ही उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. 


...म्हणून माझा साधा पेहराव - राजाभाऊ वाजे


दरम्यान, राजाभाऊ वाजे यांच्या विरोधकांकडून ते ग्रामीण भागातील आहेत. त्यांना इंग्रजी येत नाही, अशी टीका करण्यात आली होती. यावरून राजाभाऊ वाजे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजाभाऊ वाजे म्हणाले की, माझे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झालेले आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळेत मी इंग्रजीत शिकलो आहे. साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्येही माझे शिक्षण झाले आहे. नाशिकच्या महाविद्यालयातून मी पदवी घेतलेली आहे. मी ग्रामीण भागात राहतो त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अपील होईल, असा माझा साधा पेहराव असतो. तो टिकेचा विषय होऊ शकत नाही. मात्र टीका करण्यासाठी काहीच नसल्याने विरोधक असे करत असावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. 


राजाभाऊ वाजेंचे विरोधकांना थेट आव्हान 


माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन इंग्रजीतून चर्चा करावी. मी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देईन. अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली, तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. शिवसेनेच्या वाजे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना थेट आव्हानच दिले आहे. राजाभाऊ वाजे यांच्या विधानाची आता नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला


'माझ्यावरही हल्ले झालेत, मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही', प्रकाश शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर छगन भुजबळ बरसले!