Uddhav Thackeray on Narendra Modi, कल्याण : "काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेन केलं होतं, तसं चार तारखेला आम्ही डिमोदीनेशन करणार आहेत. पंतप्रधान म्हणून या तुमच्या शेवटच्या सभा आहेत. कारण 4 तारखेला भाजपची सत्ता जाणार आहे. डोंबिवली हे विद्येचे माहेर घर आहे. मला नकली संतान म्हणतात तुम्हाला मान्य आहे का?", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) म्हणाले. कल्याणमध्ये ठाकरेंच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली. 


 मोदी सरकार नाही तर गजनी सरकार 


 उद्धव ठाकरे म्हणाले, आज यांचे तळ्यात मळ्यात कुणाच्या तरी गळ्यात अशी भाजपची अवस्था आहे. मला नकली संतान म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी मला डोळा मारतात. तिसऱ्या दिवशी परत नकली शिवसेना म्हणायचं. मी माणूसकी सोडलेली नाही. पण दहा वर्ष या माणसाने झोप घेतलेली नाहीये. मी सरकारला मी मोदी सरकार नाही तर गजनी सरकार म्हणत आहे. 


यावेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटणार आहे


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर  महाराष्ट्राचे वैभव परत आणणार आहोत. गोहत्या करणाऱ्यांना उलट करणार म्हणतात पण मणिपूरमध्ये उलटे कशामुळे झालात? मिंधे तुम्ही दिल्लीश्वरांची चाकरी करत आहात. हे तुमचं हिंदूत्व आहे? हे बाळासाहेबांचे विचार आहेत? प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातला. यावेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटणार आहे. ज्याने टोप घातला त्यालाही डोक नाही आणि ज्याने घालून घेतला त्यालाही डोकं नाही. 


महाराष्ट्राचे वैभव यांनी गुजरातला नेलं आहे


मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईल, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. महाराष्ट्र लुटला जातोय तरी मिंधे दिल्लीश्वरांची चाकरी करतात. तुम्हाला वचन दिलय, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्राचे वैभव यांनी गुजरातला नेलं आहे. ते परत आणणार आहे. मोदींना महाराष्ट्राबद्दल कळवळा आलाय, असेही ठाकरे म्हणाले. ज्यांना मोठं केलं ते गद्दार झाले, पण कल्याणची ओळख गद्दारांना गाडणारी झाली पाहिजे, असं आवाहनही ठाकरेंनी केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Solapur Loksabha : सांगलीत युनीकॉर्न, सोलापुरात थेट 1 लाख रुपयांची पैज, प्रणिती शिंदे की राम सातपुते, कोण बाजी मारणार, राष्ट्रवादी-मनसे कार्यकर्त्यांची शर्यत!