Solapur Loksabha :  राज्यात चार टप्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ज्या ठिकाणी मतदान झालंय, तेथील लोकांना, कार्यकर्त्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह इतका शिगेला पोहोचलाय की, कोण निवडून येणार याच्यावरुन पैजा लावण्यात येत आहेत. सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Loksabha) तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. सोलापूर लोकसभेत (Solapur Loksabha) यंदाची लढत अतिशय चुरशीची मानली जात आहे. 


मनसे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये शर्यत 


तिसऱ्या टप्यात मतदान झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत चूरशिची झाली आहे. त्यामुळे सोलापूरचा खासदार कोण होणार याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.  राजकीय कार्यकर्ते देखील संभाव्य निकालची आकडेमोड करत आहेत. यातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आणि मनसेचे सोलापूर लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांच्यात एक लाखांची पैज लागली. त्यामुळे सोलापूरात कोण बाजी मारणार आणि पैजेचा पैसा कोणाच्या पदरी पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


सोलापुरात किती टक्के मतदान ? 


सोलापूर लोकसभेत यंदाची लढत अतिशय चुरशीची मानली जात आहे.  सोलापूर लोकसभेसाठी 57.46 टक्के इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांची दिली आहे. सोलापूर लोकसभेची निवडणूक ही थेट काँग्रेस विरुद्ध भाजप (Congress Vs BJP) अशीच रंगली. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपकडून आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवण्यात आले होते.


सोलापुरात कोणाचे किती आमदार ?


सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे स्वतः एकच महाविकास आघाडीच्या आमदार होत्या. त्याच लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरल्या आहेत. समाधान अवताडे, विजयकुमार देशमुख,  सुभाष देशमुख,  सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे 4 आमदार राम सातपुतेंसाठी ताकद लावताना दिसत आहेत. याचा फायदा राम सातपुतेंना होऊ शकतो. 


भगीरथ भालके, आडम मास्तर, मोहिते पाटलांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा 


धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा शरद पवारांसोबत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील समीकरण बदललं आहे.  भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटलांना मानणार वर्ग प्रणिती शिंदेंना साथ देऊ शकतो. पंढरपूरचे माजी आमदार स्व. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी भेट घेऊन प्रणिती शिंदे यांना पाठींबा दिलाय. तर आडम मास्तरही शिंदेंच्या मदतीला धावले आहेत. याचा फायदा प्रणिती शिंदेंना होऊ शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange Patil: तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचंय, गुंडगिरी किती दिवस सहन करायची; मनोज जरांगेंचा मुंडे बहीण-भावाला इशारा