Uddhav Thackeray on Eknath Shinde, Thane : "राजन (Rajan Vichare) मला नाही तर मला खात्री आहे की, हिंदूह्रदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल. कारण शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना आहे. काही जनांना मस्ती आली आहे. त्यांना वाटतं की, ठाणे आपली खासगी मालमत्ता आहे. ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलो आहे. आज मला खात्री पटली की, मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे जण आले आहात", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.
माझी शिवसेना वडिलोपार्जित संपत्ती आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, मला आठवते स्वातंत्र्याचा पूर्वीचा काळ होता. तेव्हा महाराष्ट्राचा एक सुपूत्र होता. त्यांनी सांगितले होते की, स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्न त्यांनी विचारला होता. आताच्या सरकारला डोकच नाही. ते खोकेबाज सरकार आहे. माझी शिवसेना वडिलोपार्जित संपत्ती आहे. मोदीजी तुम्ही पर्वाच्या मलाखतीत म्हणाले की, उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे. पण 2014 मी तुमच्या नावाची शिफारस केली होती.
असली शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ती माणसे बेअकली
जे माझ्या असली शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ती माणसे बेअकली आहेत. मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. आमची शिवसेना असली आहे. मोदींचे नाणे महाराष्टात चालत नाही. एक काळ होता हे आपल्याकडे हिणवत होते. तुमचे खासदार आमच्या मोदीजींमुळे निवडून आले म्हणत होते. गद्दारांनी त्यांच्या वडिलांचे फोटो लावा. गद्दारांजवळ हिंदूह्रदय सम्राटांचा फोटो शोभत नाही. ही मर्दांची संघटना आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
काश्मीर आमच्या हिंदूस्थानचा अविभाज्य घटक आहे
आपल्या सीमा असुरक्षित आहेत. 370 कलम काढलं, तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला आहे. कारण काश्मीर आमच्या हिंदूस्थानचा अविभाज्य घटक आहे. पण गेल्या 10 वर्षात काश्मीर असुरक्षित आहेत. तेव्हा काय केलं? सत्यपाल मलिकांनी तुमचं बिंग फोडलं. त्यांनी सांगितलं होतं रस्त्याने जाऊ देणं सैनिकांसाठी धोकादायक आहे. तुमच्या नादान पणा मुळे पुलवामा मध्ये सैनिकांचा जीव गेला. सत्यपाल मलिक यांनी तुमचे ढोंग समोर आणले आहे. यावर का बोलत नाही ? मोदी कधीही महागाई , बेकारी , नोकर्या , महिला सुरक्षेवर बोलत नाहीत. फक्त धर्मावर बोलत आहेत, असेही ठाकरेंनी सांगितले.
इतर महत्वाची बातम्या