Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांना उमेदवारी जाहीर होणार, अशी चर्चा होती. विजय करंजकर यांच्याकडून नाशिक लोकसभा निवडणुकीची तयारीही केली जात होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 


विजय करंजकर यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माझ्या सोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य असल्याचा दावा करत त्यांनी ठाकरे गटाला इशारा दिला होता. यानंतर विजय करंजकर यांनी हितचिंतकांचा मेळावा घेत नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 


मी आता नडणार आणि लढणार - विजय करंजकर 


विजय करंजकर यांनी म्हटले आहे की, तेरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना अनेकांची कामे केली. त्यामुळे आता पुढील काळात आपण सर्व मला साथ द्या. राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे. एक जण एन्ट्री करतो तर सात जण पाय ओढतात. माझ्याकडे देखील पाच जण मागे ओढायला होते, असे बोलत नाशिक जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या प्रमुख पाच नेत्यांवर विजय करंजकरांनी जोरदार टीका केली आहे. तसेच मी आता नडणार आणि लढणार, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  


विजय करंजकरांची ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका 


ते पुढे म्हणाले की,  मी पक्षासाठी बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून काम करतोय. अनेक ठिकाणी त्याग केला आहे. मी जिल्हाप्रमुख असताना अनेकांना एबी फॉर्म दिली आहेत. विधानसभेसाठी देखील मी एबी फॉर्म दिला, मात्र स्वतःच्या घरातून चहा पिऊन काम केले, कोणाचा एक कप चहाही घेतला नाही. माझी निष्ठा मातोश्री सोबत असून ज्याला मी 2008 साली उपजिल्हाप्रमुख केले. तो माझ्यावर भुंकतो, असे बोलत त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केलीय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'मी रोज व्यायाम करणारा माणूस, चांगल्या चांगल्यांची तब्येत बिघडवेल', ठाकरे गटाच्या नाराज विजय करंजकरांचा रोख कुणाकडे?


'तुम्हाला कुठं थांबायचं अन् कुठं जायचं हे स्पष्ट करा', ठाकरे गटाने बंडखोर विजय करंजकरांना सुनावले खडेबोल!