मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेच्या (ShivSena) युवा सेना (Yuva Sena) देखील कामाला लागली आहे. अशात आता युवा सेनेची फळी मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून युवासेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षासाठी आक्रमक भूमिका घेत, युवा कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण नेत्यांना या कार्यकारणीत महत्वाची संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंना (Roshni Shinde) युवासेनेच सहसचिव पद देण्यात आलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवासेनेची कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. युवासेना कार्यकारणीमध्ये शिवसेना नेते राजन विचारे यांची मुलगी धनश्री विचारे, नेते विनायक राऊत यांची मुलगी रुची राऊत आणि आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठाण्यात मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांना युवासेनेच सहसचिव पद देण्यात आलं आहे.
यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती
जय सरपोतदार, अभिषेक शिर्के, योगेश निमसे, दीपक दातीर, सिद्धेश शिंदे, रायन मेनेझेस, अश्विनी पवार, अॅड. गुरशीन साहनी, रुची राऊत, प्रियंका जोशी, दीक्षा संखे-कारकर, धनश्री विचारे यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, उपसचिवपदी हेमंत दुधवडकर, रणजित कदम, प्रथमेश सकपाळ, गीता कदम यांची तर सहसचिवपदी रोशनी शिंदे नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
महत्वाच्या नेत्यांच्या मुलांना देखील संधी....
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवासेनेची कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, यात काही नेत्यांच्या मुलांना देखील संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते राजन विचारे यांची मुलगी धनश्री विचारे, नेते विनायक राऊत यांची मुलगी रुची राऊत आणि आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंचं तरुण कार्यकर्त्यांवर अधिक भर
आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून स्वतः मुंबईतील वेगवेगळ्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखांना भेटी देत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचे तरुण कार्यकर्त्यांवर अधिक भर असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आदित्य यांनी अनेक तरुण कार्यकर्त्यांना पक्षात महत्वाच्या पदावर संधी दिल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत याच तरुणांचा पक्षाला फायदा देखील होऊ शकतो. अशात आता युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :