सातारा : लोकसभा निवडणुकांसाठी घमासान प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज कोल्हापुरात जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे बडे नेते आज कोल्हापुरात (Kolhapur) सभास्थळी असणार आहेत. एकडीकडे मोदी आणि शाह यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला असून दुसरीकडे उमेदवारही आपल्या स्तरावर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपाने काही दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना वन नेशन, वन इलेक्शन, 75 वर्षांवरील वृद्धांवर 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, वन रँक, वन पेन्शनवरही भाष्य केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता साताऱ्याचे राजे आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही आपला संकल्पनामा जाहीर केला आहे. सातारचा जवान आमची शान...तुमचं शौर्य आमचा अभिमान ! या टॅगलाईनने उदयनराजेंचा निवडणूक संकल्पनामा जाहीर करण्यात आला आहे. 


सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात चांगलीच रस्सीखेच सुरु होती. त्यात, भाजपाने ही जागा उदयनराजेंसाठी आग्रहाने आपल्याकडे खेचून घेतली. तत्पूर्वीच उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केली होती. तर, भाजपाच्या पहिल्या यादीत राजेंचं नाव न आल्याने साताऱ्यातील भाजपा समर्थकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीनेही माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदेना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगला आहे. त्याच, पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी निवडणुकीसाठीचा संकल्पमाना जाहीर केला. त्यामध्ये, सैन्यातील जवान हाच केंद्रबिंदू माननण्यात आल्याचे दिसून येते. 


सातारा ही लढवय्यांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला लढाईचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून साताऱ्यातील हजारो भूमीपुत्र देशाच्या संरक्षणात सीमारेषेवर कार्यरत आहेत. आपल्या निवडणूक लढाईत उदयनराजेंनी संकल्पनामा जाहीर करताना याच सैन्यातील जवानांचा संदर्भ दिला आहेय 


शिवछत्रपतींचा वारसदार म्हणून..


छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला दोन सरसेनापती देणाऱ्या आपल्या जिल्ह्याची लढाऊ परंपरा तुम्ही जोपासत आहात. देशाच्या सीमांचं प्राणपणानं रक्षण करणारे तुम्ही भारतमातेचे खरे सुपुत्र आहात. तुमचे परिश्रम आणि पराक्रम यांची जाणीव असलेलं कणखर सरकार केंद्रात गेली दहा वर्षे सत्तेत आहे आणि देशाच्या छुप्या शत्रूच्या कारवाया मोडून काढण्याच्या धोरणामुळं दहशतवाद कमी झाला आहे, हे तुम्ही जाणताच. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भक्कम नेतृत्वामुळं आपल्या देशाचा जगात दबदबा निर्माण झाला असून, भारताची भूमिका जगाकडून आज गांभीर्यानं घेतली जाते. शिवछत्रपतींच्या घराण्याचा वारसदार म्हणून अशा शक्तिशाली सरकारसोबत काम करणं आम्हाला अभिमानास्पद वाटतं
आणि कोणत्याही लढाईचा प्रारंभ लढवय्यांच्या साथीनं करण्याचा शिरस्ता कायम ठेवून आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत, असे म्हणत उदयनराजेंनी जवानांसाठी आपला संकल्पमान जाहीर केला आहे. सातरचा जवान देशाची शान..  तुमचं शौर्य,आमचा अभिमान ! असे उदयनराजेंनी म्हटले आहे.  


संकल्पनाम्यात काय