सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीसाठी मतदान 5 एप्रिलला पार पडणार आहे तर निकाल 6 एप्रिलला जाहीर होईल. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर विरोधकांनी ताकदीनं निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील लक्ष घालणार असल्याचं म्हटलं. कारखान्याचा सभासद नसलो तरी त्यांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. 


उदयनराजे भोसले काय म्हणाले?


कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. मी या कारखान्याचा सभासद नसलो तरी या कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता उदयनराजे भोसले यांनी केला आहे. कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती, मात्र ती मिळाली नाही. कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे.


सह्याद्री साखर कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सत्तांतर होईल असा दावा केलाय. कारखान्याचे सभासद कुणाला कारखान्याची सत्ता देतात हे पाहावं लागेल. मतदार कारखाना कुणाच्या हाती सोपवायचा याचा निर्णय 5 एप्रिलला करतील. तर, 6 एप्रिलला मतदान होईल.


शिवाजी महाराजांची संकल्पना सर्वधर्मसमभावाची


मंत्री नितेश राणे यांनी मुस्लीम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडून करा, असे वक्तव्य केलं होते.  उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.मी नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकले नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना राबवली होती. त्यांनी जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो.हिंदू मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही.नितेश राणेंना असं म्हणायचे असेल औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे ते खोदून काढा, असं तर मी किती वेळा तरी सांगितलं आहे. तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं असा टोला देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे



इतर बातम्या :


धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार