Udya Samant: राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाने मोठा गदारोळ उडाला आहे. तर दुसरीकडे राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता साऱ्यांना महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी केली जात आहे.शिवसेना ठाकरे गट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा केल्यानंतर त्यांच्यात काय चाललंय हे महाराष्ट्राच्या मतदाराला कळत नसल्याची प्रतिक्रीया शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.


ज्या उबठा नेत्याने देवेंद्र फडणवीसांवर खालची टीका केली आहे, ती का  केली होती तर खोटारडे आरोप करून ते सत्तेवर येऊ पाहत होते,टीका करत होते आता त्यांना मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांना वाटत असावे, कारण पुढची 15 वर्ष त्यांना काही सोय नाही असं उदय सामंत म्हणालेत.


काय म्हणाले उदय सामंत?


'उबठा वेगळं लढणार यावर त्यांच्यात काय चालले आहे हे जनतेला आणि आम्हाला ही कळत नाही, ते हाताचा प्रचार करू शकतात तर काहीही होऊ शकते. योग्य वळणावर येतील की नाही त्यांना माहिती. अथवा महाविकास आघाडीतून ते बाहेर पडत असतील. उबठा वेगळं लढणार यावर त्यांच्यात काय चालले आहे हे जनतेला आणि आम्हाला ही कळत नाही. असे उदय सामंत म्हणाले. संतोष देशमुख  यांची मुलगी म्हणते सीआयडी ने माहिती दिली नाही, यावर कुटुंबाला माहिती दिली पाहिजे असे माझं ही म्हणणं आहे...पारदर्शक तपास होतोय तर माहिती द्यायला हवी. बीड आरोपी वर कठोर कारवाई होईल, सरकारने भूमिका स्पष्ट आहे जनतेची मागणी पूर्ण होईल, शिंदे साहेबांची हीच भूमिका आहे, धनंजय देशमुख सोबत एकनाथ शिंदे आणि मी कालच बोललो आहे.असेही ते म्हणाले.


मविआला घरचा आहेर!


लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात महायुतीचा (Mahayuti) दारूण पराभव झाला तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) भरघोस यश मिळाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यानंतर नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मविआला टोला लगावला. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असे म्हणत त्यांनी मविआला घरचा आहेर दिला. तर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही, असे म्हणत मित्रपक्षांवर निशाण साधला. यानंतर संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.  


हेही वाचा:


Jitendra Awhad: 'स्वबळाची इच्छा असल्यास आम्ही थांबवणारे कोण...', राऊतांच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हांडांची मांडली स्पष्ट भूमिका, तिन्ही नेत्यांच्या चर्चेबाबत केला खुलासा