नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार जाणूनबुजून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राला विकास निधीपासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे. यामुळे नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आल्याचे पाहायला मिळत आहे. 


देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्य सरकारने नागपूरतील (Nagpur) अर्धवट असलेल्या विकासकामांना गतिमान करण्यासाठी 470 कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. मात्र, नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्रांमध्ये त्या 470 कोटींच्या विशेष निधीचा वाटप करण्यात आलं असून उत्तर नागपूर या एकमेव विधानसभा क्षेत्राला या विशेष निधीच्या वाटपामधून वगळण्यात आल्यानंतर नितीन राऊत यांनी हे आरोप केले आहे. फडणवीस सरकार असा दुजाभाव करून उत्तर नागपुरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या बौद्ध तसेच अल्पसंख्यांक नागरिकांना टार्गेट करून विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोपही नितीन राऊत यांनी केला आहे. आपण लवकरच या विषयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आता नितीन राऊत यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


का देण्यात आलाय नागपूरसाठी विशेष निधी?


2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नागपूर शहरातील तत्कालीन विकास कामांसाठी मंजूर असलेल्या 169 कोटी रुपयांचा निधी थांबवण्यात आला होता. त्यामुळे नागपूर आतील 54 वेगवेगळे विकासकामे अर्धवट स्थितीत अडकले होते. तेव्हा कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी निधीअभावी काम बंद केले होते. 2022 मध्ये शिंदे आणि फडणवीस यांचं महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर थांबलेल्या गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. आता त्याच अर्धवट कामांना पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच काही नव्या विकास कामांसाठी हा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. 


नागपूरातील अर्धवट विकास कामांसाठी मंजूर झालेला विशेष निधी



  • दक्षिण नागपूर - 90 कोटी

  • पूर्व नागपूर - 160 कोटी

  • दक्षिण पश्चिम नागपूर - 150 कोटी

  • पश्चिम नागपूर - 15 कोटी

  • मध्य नागपूर - 30 कोटी

  • हुडकेश्र्वर नरसाळा - 35 कोटी


इतर महत्त्वाच्या बातम्या


Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी


Vaibhavi Deshmukh : संतोष देशमुखांच्या लेकीचा पोलिसांवर आरोप! व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'तपासाबाबत पोलीस काहीच...'