मुंबई : काँग्रेसचा (Congress) हात सोडून भाजपचं (BJP) कमळ हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडलं. एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बड्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेऊन, अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केलं? दोन वेळा मुख्यमंत्री, 14-15 वर्ष मंत्रिपद मिळालं, प्रदेश काँग्रेस कमिटीचं सदस्य, आमदारकी, खासदारकी दिली. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली त्यांनी कारण सांगावं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता माफ करणार नाही, असं रमेश चन्नीथला म्हणाले.


रमेश चेन्नीथला काय म्हणाले?


महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या सर्व नेत्यासोबत चर्चा केली. काँग्रेस मधून अशोक चव्हाण सोडून कोणीही जाणार नाही. परवा दुपारी २ वाजेपर्यंत अशोक चव्हाण आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते पण आम्हला काही बोलले नाहीत. त्यांनी काँग्रेस का सोडलं? त्यांचे डे कुठलेही कारण नाही. काँग्रेसमध्ये त्यांना अनेक पदे देण्यात आलीब. मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आलं. असे पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकार करणार नाही. अशोक चव्हाण यांनी सांगायला हवं, की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे? काँग्रेसमध्ये काही अडचण होती का? त्यांनी कुठलंही कारण पक्ष सोडताना सांगितलं नाही.भाजप वॉशिंग मशीन आहे का? भाजपने ज्यांच्यावर आरोप केलं केले भाजपमध्ये गेले. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळाबद्दल बोलले, मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात. आज माझी बैठक झाली, राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. ही त्यांची जबाबदारी आहे. नांदेडचे नगसेवक आम्हाला भेटायला आले. त्यांना सुद्धा चव्हाण यांनी सांगितलं नाही पक्ष प्रवेश बद्दल. आम्ही कमजोर होणार नाही, अजून ताकदीने लढू. मी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बोललो, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली, आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नाही, असं चेन्नीथला म्हणाले.


 नाना पटोले यांचा अशोक चव्हाणांवर घणाघात


अशोक चव्हाण यांना विशेष महत्व पक्षात दिलं होतं. अशोक चव्हाण यांना मागच्या रांगेत आता बसावं लागेल, कारण मला तिकडचा चांगला अनुभव आहे. बाळासाहेब थोरातांसारख्या वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नेतृत्व करायची त्यांना सवय आहे. त्यांना तिकडे ही संधी  मिळणार नाही. अजूनही आम्ही अशोक चव्हाण यांचं स्वागत करू. फडणवीस यांचं झालंय असं दिल्लीचे दोन आका हे सर्वे करतात, त्यात महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा आहेत. त्यामुळे हे सगळं करत आहेत. १५ तारखेला आमची बैठक आहे. आमच्याकडे नांदेडसाठी उमेदवार आहे, असं नाना पटोले म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या 


 कोकणातील राजकीय शिमग्याची सुरुवात, भास्कर जाधव आणि निलेश राणेंमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी