Toll Free For Light Vehicles: राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Governent Cabinet Meeting) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर सरकारने टोलमाफीचा (Toll waiver in mumbai) निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर)  रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या वाहनांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर ABP माझाला आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राज ठाकरे म्हणाले की, "गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा,  नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल..." असा शब्दात राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टोलनाक्यांवर पेढे वाटत या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान,   'एबीपी माझा'शी बोलताना हा विजय मनसेच्या बारा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याचे यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


बारा वर्षानंतर अखेर आमच्या लढ्याला यश- अविनाश जाधव


राज्य सरकारने घेतलेला हा अतिशय मोठा निर्णय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या बारा वर्षांपासून हा लढा देत होते. गेल्या बारा वर्षात आम्ही कित्येकदा लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तडीपारीची शिक्षा भोगली. अनेक मनसे सैनिक, महिला पदाधिकारी जेलमध्ये गेल्या. अजही आम्ही या टोल प्रकरणात कोर्टामध्ये हजेरी लावत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे. अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


पुढे ते म्हणाले राज साहेब ठाकरे कित्येकदा या टोल नाक्यावर स्वतः उभे राहिले आहेत. त्यांनी स्वत: वाहनांना वाट करून दिली आहे. आम्ही कायम हा लढा आजपर्यंत देत आलो. बारा वर्षानंतर अखेर या लढ्याला यश आले आहे. राज साहेब ठाकरे यांनी या लढ्याला पाठबळ दिल्याने हे यश मिळू शकले आहे. किंबहुना या आधी देखील 68 टोल नाके बंद झाले आहेत.  ते केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच बंद झाले आहे. आज अजून पाच टोल नाके बंद झाले आहेत, ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच झाले आहे, असेही मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले.  


याआधी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले?


राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे. 


हे ही वाचा