Ladki Bahin Yojana नागपूर : राज्यात सध्या महायुती सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) बोलबाला सुरू आहे. अनेक ठिकाणी या योजनेचे कार्यक्रम, शुभारंभ केले जात आहेत. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची कुठलीही संधी न सोडताना दिसत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) विरोधात नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून भाजप आणि काँग्रेस मध्ये यापूर्वी जोरदार हमरी तुमरी रंगताना बघायला मिळाली आहे. आता याच मुद्द्याला घेऊन काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान दिले आहे.


यात ते म्हणाले की, मी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोललो असेल तर ते सिद्ध करावे, अन्यथा संविधान चौकात उठा-बशा माराव्यात, असे आव्हानच सुनील केदार यांनी दिले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केदारांनी हे वक्तव्य केलय. त्यामुळे आता त्यांच्या या आव्हानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


लाडकी बहिण योजनेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका


काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या जवळचे मित्र असलेल्या अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहिण योजनेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलीय. काँग्रेसचा (Congress) मुळातच लाडकी बहिणी योजनेला आणि महिलांसाठीच्या इतर शासकीय योजनांना विरोध आहे. त्यामुळेच ते आपल्या मित्र आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत असल्याचा आरोप भाजप नेते सुधाकर कोहळे यांनी यापूर्वी केला आहे. काँग्रेसने राज्यातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी ही कोहळे यांनी केली आहे.


तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. भाजपकडून ज्या अनिल वडपल्लीवार वर लाडकी बहीण योजने विरोधात याचिका टाकल्याचा आरोप केला आहे, ते अनिल वडपल्लीवार काँग्रेस पक्षाचे सदस्य सुद्धा नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुतीची लाडकी बहीण योजना फसवी असून काँग्रेस पक्षाला त्यापेक्षा जास्त चांगली महालक्ष्मी योजना महिलांसमोर मांडल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला होता. दरम्यान आता हाच मुद्याला घेऊन आता काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या