Uttam Jankar on Ajit Pawar : "अजित पवारांची (Ajit Pawar) ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्ष ही अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवार देखील राजकारणात नसतील", अशी घणाघाती टीका धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केली. ते इंदापुरात बोलत बोलत होते.


भाजपकडून मी दुखावलं गेलो होतो 


उत्तम जानकर म्हणाले, सुप्रिया सुळे एकट्या पडल्या आहेत. त्यांचे सगळे नेते काढून घेतले त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणाने त्यांना त्याचा फायदा होईल.  भाजपकडून मी दुखावलं गेलो होतो, त्यामुळे अजित पवारांकडे गेलो. आम्ही समाजाची फसवणूक केली का? हे मतदान झाल्यानंतर तुम्हाला कळेल. आमच्या तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त लीड मोहिते पाटलांना मिळेल. शरद पवार संकट असताना त्यांना मदतीचा हात देणं गरजेची गोष्ट होती, असंही जानकर यांनी नमूद केलं. 


अजित पवारांचा दरारा होता तो आता संपला


पुढे बोलताना जानकर म्हणाले, बंड करणं गरजेचं होतं. बंड करून अनेक जण जेलमध्ये गेले तरी आम्ही बंड केलं. अजित पवार काल हत्ती होते, आज उंदीर झालेले दिसतायेत. अजित पवारांचा दरारा होता तो आता संपला. अजित पवारांची ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्षही अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवार देखील राजकारणात नसतील. 


मी आणि मोहिते पाटील एकत्र झालं की शिल्लक कोणी राहतच नाही


ज्या दिवशी शरद पवारांची साथ अजित पवारांनी सोडली त्यादिवशी अजित पवारांचं पात्र राजकारणातून संपलं.  बारामती लोकसभा मतदारसंघातील 16 /17 गाव माझ्या ऐकण्यातली आहेत. त्यामुळे मी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करेन. मोहिते पाटलांचा प्रचार करण्याची मला गरज नाही, कारण मी आणि मोहिते पाटील एकत्र झालं की तालुक्यात शिल्लक कोणी राहतच नाही, असेही उत्तम जानकर म्हणाले.  


महादेव जानकर यांना उभं करण्याचा प्रयत्न केला


बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांना खात्री आली होती. आपला टिकाव लागणार नाही, हे त्यांना समजलं त्यामुळे त्यांनी महादेव जानकर यांना उभं करण्याचा प्रयत्न केला. परंतु महादेव जानकर यांनी ऐकलं नाही परभणीला गेले, असंही उत्तम जानकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Solapur Loksabha constituency : भाजप आमदारांची फिल्डिंग, प्रणिती शिंदेंचा प्रचाराचा धडाका, लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी? सोलापुरात तगडी फाईट