Thane Shiv Sena Vs MNS Rada: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून काल (10 ऑगस्ट) ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह खासदार संजय राऊत आणि अनेक महत्वाचे नेते रात्री 8.30 च्या दरम्यान ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आले. त्यामुळे ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसून आले. 


मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमास्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती.  या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर गुन्हा देखील नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच या आंदोलनानंतर सर्व कायकर्त्यांना पोलिसांनी नौपाडा पोलीस स्थानकात आणले होते. यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना व्हिडीओ कॉल केला आणि एकच जल्लोष करण्यात आला. 


नेमकं काय घडलं?


राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याची घटना घडली होती. ही गोष्ट मनसेच्या मोठी जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रियाही आल्या. खुद्द राज ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया देत, माझ्या नादी लागू नका नाहीतर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलं तर सभाही घेऊ देणार नाहीत असा इशाराच दिला.राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना तशी संधीही मिळाली. शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.


उद्धव ठाकरेंची फक्त शिंदे आणि भाजपवर निशाणा-


कारवर शेण फेकल्यानंतर उद्धव ठाकरे ठाण्यातील भाषणात काहीतरी बोलतील असं वाटत असताना तसं काही झालं नाही. ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी त्यांच्या भाषणात त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. पण राज ठाकरे आणि मनसेच्या राड्यावर एकही शब्द बोलले नाहीत. विधानसभेसाठी आपलं टार्गेट फक्त एकनाथ शिंदे आणि भाजप हेच असेल असा संदेश  उद्धव ठाकरेंनी दिल्याची चर्चा  राजकीय वर्तुळात आहे. 


संबंधित बातमी-


Thane Rada VIDEO : आधी गाडीवर बांगड्या, शेण फेकले, नंतर मनसैनिक थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात घुसले; ठाण्यात शिवसेना-मनसेत राडा


संबंधित व्हिडीओ-