Anita Birje, Thane : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन मेळावा पार पडला. यावेळी मोठा राडा झाला. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा केला. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या, नारळ आणि शेण फेकण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यात मेळावा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळावा सुरू असतानाच शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या  अनिता बिरजे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 


निता बिर्जे या ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख होत्या


शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील अनिता बिर्जे या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची सोबत जाणार आहेत, त्यामुळे हा ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. अनिता बिर्जे या ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख होत्या. मात्र, आता त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असून वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. 


ठाण्यातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल 


ठाणे उभ राहिलं ते शिवसैनिकांचा प्रेम आहे. शिवसैनिकांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेंची दाढी उगवली नसती. संजयने उत्तम भाषण केलं आहे. आता उत्सुकता नमक हराम 2 ची आहे. समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. नागाची उमपा तुम्ही दिली पण मला नागाचा अपमान करायचा नाही. हे मांडूळ आहे. हे सरपटणारे प्राणी आहे. हे मोदींसमोर वळवळणारे म्हांडूळ आहे. रोज घालीन लोटांगण सुरु आहे", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते ठाण्यातील मेळाव्यात बोलत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Amit Shah on Harshvardhan Patil : जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो, तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या; अमित शाहांकडून हर्षवर्धन पाटलांचे कौतुक