BJP Leader's and Naresh Mhaske : ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वासू सहकारी असलेल्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना मैदानात उतरवलंय. मात्र, म्हस्केंना उमेदवारी जाहीर होताच ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. नवी मुंबईमध्ये भाजपच्या 58 आजी-माजी नगरसेवकांनी आपला पदाच्या राजीनामा गणेश नाईक (Ganesh Naik) यांना सोपवलेला होता. दरम्यान, आता भाजपच्या मुख्यालयांवर हालचालींना वेग आला आहे. 


भाजप मुख्यालयावर हालचालींना वेग 


नवी मुंबईमध्ये भाजपच्या 58 आजी-माजी नगरसेवकांनी आपला पदाच्या राजीनामा गणेश नाईक यांना सोपवलेला होता. संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या वर्तकनगर येथील मुख्य कार्यालयावरती ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवण्यात आलीये. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 


संजीव नाईक काय म्हणाले? 


नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी होती, ती नाराजी योग्य आहे. पण सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी पक्षाच्या आणि महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराजी दूर करुन कामाला लागण्याचे आवाहन मी करत आहे, असं संजीव नाईक यांनी म्हटलं आहे. 


भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु 


संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु आहे. मुंबईनंतर ठाण्यात देखील भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ओबीसी मोर्चा सरचिटणीस शरद बिराजदार, बेटी बचाव बेटी पढाव समन्वयक मिलिंद नैबागकर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला ठाण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध आहे.  भाजपच्या जिल्हा आढावा बैठकीत म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आलाय. 


राजन विचारेंविरोधात नरेस म्हस्केंना तिकीट 


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. तर राजन विचारेंच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेने नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, ठाणे मतदारसंघात भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने शिंदेंच्या उमेदवाराला विरोध सुरु झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Thane : शिंदेंच्या नरेश मस्केंची डोकेदुखी थांबेना, भाजपचा विरोध सुरूच, नवी मुंबईनंतर मिरा भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा