ठाणे :  शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची (Thane Lok Sabha Election)  उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र वायरल झाले आहे, ज्यात प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचं स्वतः सरनाईक यांनी म्हटलं आहे. एकीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवर उमेदवाराची घोषणा झालेली नाही. ठाण्याच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वसामान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो. 


ठाण्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल  झाले आहे. प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचे स्वतः सरनाईक यांनी म्हटले आहे. नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या क्षेत्रात असलेल्या गुन्ह्यांची माहिती या पत्राद्वारे सरनाईक यांनी मागितली आहे. निवडणूक लढवण्यासाठी गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक आहे.  हे पत्र 29 मार्चचे आहे, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत, मात्र ठाण्याची जागा सेनेला सुटली असल्याची चर्चा आहे, तर रत्नागिरीचा जागा ही भाजपला सुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही जागेचा तिढा खरच  सुटला का हा प्रश्न आहे. 


शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही


मिळालेल्या माहितीनुसार अजुनही सिंधुदुर्गच्या जागेवर उमेदवाराची घोषणा झालेली नाही कारण इकडे ठाण्याचा निर्णय झालेला नाही. ठाण्याच्या जागेसाठी शिंदे गटाकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वमान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो. 


ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पदरात पडणार?


 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. ठाणे मतदारसंघ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषदेचे रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा आहे. सोबतच भाजप नेत्यांनी या जागेवर दावा केला असून, भाजपचे काही वरिष्ठ नेते सुद्धा यासाठी प्रचंड आग्रही असल्याची चर्चा आहे. तर, भाजपकडून डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.  


हे ही वाचा :


उत्तर-मध्य मुंबईसाठी भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात, माधुरी दीक्षितने नकार दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा