मुंबई: महाराष्ट्राची आयपीएलपेक्षा वाईट अवस्था झाली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी केली. संजय राऊत आज 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमासाठी एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली.
तुम्ही लहानपणी कबड्डी, क्रिकेट असे स्पोर्ट्स खेळले असाल. टीम करुन खेळायचे. यामध्ये रोज नवीन टीम असायची, नवीन कॅप्टन असायचा...तोच फॉरमॅट आपण आयपीएलमध्ये बघितला..त्यामुळे महाराष्ट्राची देखील आता आयपीएल झालीय का? आणि ते बघताना काय वाटतं, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. यावर महाराष्ट्राची आयपीएलपेक्षा वाईट अवस्था झालीय. आयपीएलला थोडी तरी प्रतिष्ठा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच आयपीएलमध्ये देखील खेळाडूंचा लिलाव होतो. गुजरातचा एक खेळाडू मुंबई आला आणि 17 कोटीला विकला गेला. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली, म्हणजे खोके तिकडे आहेत, तसेच इकडेही आहेत, असं संजय राऊतांनी सांगितले.
नजिकच्या काळात दोन्ही ठाकरे एकत्र येतील?, संजय राऊत म्हणाले...
महाराष्ट्रात अनेकांची अशी इच्छा आहे की, दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, तुम्हाला अशी शक्यता दिसतेय का? दोन्ही ठाकरे नजिकच्या काळात एकत्र येतील? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दोन भाऊ आहे ते शेवटी, दोन भाऊ एकत्रच आहेत, फक्त राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब आणि भाऊ म्हणून ते दोघं एकत्र आहेतच. आम्हीही दोघांशी संबंध ठेवतो, त्यात काही. महाराष्ट्र दिलदार आहे."
फक्त 8 दिवसांसाठीत माझ्याकडे ईडी, सीबीआय द्या, संजय राऊतांचं विधान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "मी कधीच मंत्रिपदाचा विचार केला नाही. इतकी वर्ष मी दिल्लीत आहे, पण मंत्रिपदाचा विचार कधीच केला नाही. पण मला नक्कीच आट दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही जी खाती आहे, त्यांचा कंट्रोल माझ्यासाठी असावा, फक्त आठ दिवसासाठी, एवढंच मला वाटतं. मला दाखवायचंय ही खाती कशी चालतात, असं संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
ईडी आणि सीबीआय 8 दिवसांसाठी माझ्याकडे द्या, मग दाखवतो; तोंडी परीक्षा कार्यक्रमात संजय राऊत कडाडले!
शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचे परतीसाठी फोन, संजय राऊतांचा 'तोंडी परीक्षेत' मोठा दावा
Sanjay Raut : यंदाच्या निवडणुकीत गद्दारांवर लक्ष, मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद : संजय राऊत