Opposition Leader Maharashtra मुंबई: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेतेपदसाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यामुळं महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु आहे. याच विषयावरुन काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीनं अर्ज भरला नाही. पण त्याबदल्यात विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांनी प्रस्ताव ठेवला, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची मागणी देवेंद्र फडणवीस मान्य करणार का?, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस सकारात्मक-
1999 पासून ची परंपरा होती. सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपदस्थ तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद...भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं अशी विनंती आम्ही देवेंद्र फडणवीसांसमोर केली. आमच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) देखील सकारात्मकता दिसली, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीचा सन्मान करावा- भास्कर जाधव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा सन्मान करावा दिल्लीच्या 70 सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे 67 आणि भाजपचे केवळ 3 आमदार निवडून आले होते. तरीही अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन लोकशाहीचा सन्मान केला होता. तसाच सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात करतील, असे वाटते. आमच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते निवडीसाठी 10 टक्के आमदार संख्येची तरतूद नाही. त्यामुळेच आम्ही यासंदर्भात माहिती मागवली आहे, असंही भास्कर जाधव यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय?
विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 15, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाल्या