Hingoli: विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांग यांनी गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटात पैसे वाटले असून ही रक्कम लाखो रुपयांत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब  ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी केलाय. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, निवडणूक विभाग यांना निवेदन देऊन केली आहे.


वाटप केलेला पैसा लाखोंमध्ये


विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटात पैसे वाटल्याचा ठपका ठेवत उबाठा जिल्हाप्रमुखानं जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधिक्षक व निवडणूक विभागाला निवेदन दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. उबाठा शिवसेनेचे गोपू पाटील यांनी हा सगळा पैसा अवैध धंद्यातून येत असल्याचं सांगत लाखोंच्या घरात असल्याचा आरोप आमदार बांगर यांच्यावर केलाय. 


बांगरांची चौकशी करण्याची मागणी


विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना या काळात आमदार वेगवेगळी शक्कल लढवून मतदारापर्यंत पोहोचत आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी चक्क मतदारसंघामध्ये दवंडी पिटून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.  कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावतीने मतदार संघामध्ये रुपुर या गावात पैसे वाटप  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमांमध्ये महिलांना चक्क पाकिटातून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. व्हिडिओमध्ये आमदार बांगर स्वतः पैसे वाटप करताना पाहायला मिळत आहेत. वाटप केलेल्या या पैशांची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. 


मतदारांना पैसे वाटून प्रलोभन देण्याचं काम


वाळू ,नकली दारू ,प्रतिबंधित गुटखा ,जुगार अड्डा, मटका इत्यादी आलेल्या अवैध धंद्यातून पैसा मतदारांना वाटून प्रलोभन देण्याचे काम सुरू आहे. असा आरोप आमदार बांगरांवर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी पैसे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करत गावभर दिवंडी पिटत बांगरांनी पैसे वाटल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


हेही वाचा:


Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय