Tamilnadu CM: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Mk Stalin) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बुलेटिननुसार, एमके स्टॅलिन यांचा कोरोना रिपोर्ट 12 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना कोविड संबंधित लक्षणांच्या तपासणीसाठी अलवरपेट येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एमके स्टॅलिन यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करून माहिती दिली होती की, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. सर्वजण सुरक्षित रहा आणि मास्कचा वापर करा. यासोबतच लस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीसाठी, 11 आणि 12 जुलै रोजी स्टॅलिन एका लग्न समारंभात सहभागी झाले होते. या लग्नात ते अनेक लोकांना भेटले होते. यावेळी त्यांनी मास्कही घातला नव्हता. याशिवाय 8 आणि 9 तारखेला स्टॅलिन यांनी तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील सरकारी कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असतानाही मास्क न घालता भाग घेतला.
देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 20 हजार 139 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच या कालावधीत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढताना दिसत आहे. त्याचवेळी बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 16906 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कालच्या तुलनेत आज 3233 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Cancellation of Ride : आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होणार कारवाई
GST News : सामन्यांच्या खिशाला बसणार झळ, अनेक वस्तूंवर GST लागू करण्याचा निर्णय
Covid19 : चिंताजनक! कोरोना विषाणूचा फैलाव वाढला; देशात 20 हजार 139 नवे कोरोनाबाधित, 38 रुग्णांचा मृत्यू रुग्ण