Sushma Andhare on Yugedra Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार 'पिंक सरडा' असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार म्हणाले की, टीका चुकीची आहे. शेवटी अजित पवार माझे काका आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि युगेंद्र पवारांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे काय काय म्हणाल्या ?
सुषमा अंधारे म्हणाल्या, पवार कुटुंबातील एक धारणा आहे ते कितीही भांडतात-झगडतात. मात्र माझा दादा,माझा भाऊ असं म्हणत एकत्र येतात. त्यामुळे कुटुंब म्हणून योगेंद्र पवार यांना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केलेली टीका याबाबत वाईट वाटलं असेल. मात्र तुम्ही हे लक्षात घ्या ज्यावेळेस योगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरतील,त्यावेळी त्यांची जी भाषण होतील त्याचे रेकॉर्डिंग देखील करणारे तुम्हीच असाल.
दक्षिणेकडची पद्धत आहे की जो पहिल्यांदा बोलतो,तो महत्वाचा असतो
जयंत पाटील यांचं वक्तव्ये खुप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की शेवटी बोलणारा व्यक्ती महत्त्वाचा असतो. माञ पवार साहेबांनी सांगितलं आहे की, दक्षिणेकडची पद्धत आहे की जो पहिल्यांदा बोलतो,तो महत्वाचा असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाचे आहेत हे अधोरेखीत करा. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला वाटणार माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. तुम्ही लक्षात घ्या हे मी म्हणत नाही हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जे प्रचंड अनुभवी आहेत ते जयंत पाटील म्हणत आहेत, असंही अंधारे यांनी नमूद केलं.
सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, तुम्ही संजय राऊत यांचं दुसरा वक्तव्य पहा. ते म्हणाले सुप्रिया ताई तुमच्यासाठी अख्खा महाराष्ट्र लढलेला आहे. त्यामुळे काल कुणी पिंक सुट घालून म्हटला असेल की मी चुकलो आहे. वगैरे तर काय भूमिका घ्यायची हे जबाबदारीने घ्या. कारण तुमच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने दुश्मनी घेतली आहे.
ज्या अर्थी संजय राऊत स्टेजवरून हे स्पष्टपणे म्हणत आहे त्याअर्थी सर्वांसाठी हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला पुन्हा असं काहीही करता येणार नाही तुम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जावे लागेल. तुम्ही जयंत पाटलांच्या बाबत दुसरा अर्थ घ्या की आत्ताचा अर्थमंत्री चांगला लाभलेला नाही जयंत पाटील हे चांगले अर्थमंत्री होऊ शकतात. दरवेळी तुम्ही महाविकास आघाडीत खूसपट निघू शकेल असं का प्रश्न विचारत आहात. नारायण राणेंच्या खासदारकीबाबत कोर्टाने आता त्यांना समन्स पाठवला आहे. न्यायव्यवस्थेकडून आम्ही आशावादी आहोत की लवकरात लवकर आम्हाला निकाल मिळेल. अमोल कीर्तीकरांच्या बाबतीतली घटना आणि विनायक राऊतांबाबतची घटना अतिशय संशयास्पद आहे, असंही अंधारे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
लाडकी बहीण योजनेचा लाभ 'भावाला', अर्ज न करताही चक्क पुरुषाच्या खात्यावर जमा झाले पैसे, तरुणही हबकला