Atal Setu Bridge : मुंबईतील अटल सेतू उड्डाणपुलावरुन उडी मारत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत्महत्या करण्यासाठी उडी मारताच महिलेच्या केसांना ओढत वर ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर 4 ते 5 ट्रॅफिक पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करु संबंधित महिलेचे प्राण वाचवले आहेत. महिलेला मृत्यूच्या कचाट्यातून वाचवल्यामुळे सर्व पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. चार पोलिसांनी एकत्रितपणे शर्थीचे प्रयत्न केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचलाय. 






आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वाचविण्यात यश 


मुंबईवरून नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गीकेवर असलेल्या अटल सेतूवरुन उडी मारत एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अटल सेतू उड्डाणपुलावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वाचविण्यात यश आले आहे. नावाशेव्हा वाहतूक पोलीसांनी 56 वर्षीय महिलेचे प्राण वाचवले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला मुलूंड येथे राहणारी असून संध्याकाळी 7 च्या दरम्यान आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न होता. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ ,किरण मात्रे,यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले आहेत. 









इतर महत्वाच्या बातम्या 


Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानला जाणार का? जय शाह यांनी दिलं पीसीबीचं चिंता वाढवणारं उत्तर...