Sushma Andhare: परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे . दुपारी तीन वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर डिपार्चर गेटला विचित्र घटना घडल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितले . एक व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करत होता, ओळखीचा असेल म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याची धमकी देत होता .सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव वेगाने निघून गेला . देवेंद्रजी आपण यंत्रणेकडून वस्तुस्थिती तपासावीदहशत आणि दबाव तंत्राचे हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणे नागरिक म्हणून जबाबदारी आहे असं वाटलं, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट केलं आहे . 


राज्यात परभणी हिंसाचारानंतर घडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाने सोमवारी राज्यात वातावरण तापलं होतं . शवविच्छेदनानंतर मृत्यूचा धक्कादायक कारण समोर आल्यानंतर राजकीय घटनांनाही वेग आला होता . दरम्यान, सुषमा अंधारे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टने खळबळ उडाली आहे. शासनाने मला सुरक्षा पुरवावी असा अजिबात वाटत नाही कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही बाकी आपली मर्जी अशी तळ टीपही त्यांनी जोडली आहे .


 



काय म्हटलंय सुषमा अंधारेंनी ?


परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे . अशातच आत्ता तीन वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली.  मी, माझी सात वर्षांची लेख आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्ध्या टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. 
गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. देवेंद्रजी, 
आपण आपला यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खूपदा वाटले. मात्र दहशत आणि दबाव तंत्राचे हे गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले. 


#टीप शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी.


हेही वाचा:
 जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं.... अन् छगन भुजबळ गळ्यातला मफलर उडवून निघून गेले, त्या सूचक ओळींची जोरदार चर्चा