Sushma Andhare On Eknath Shinde : ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात, याचा साक्षीदार मीच आहे . माझ्यावर घरावर आंदोलन करण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, शिंदेंच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे बालिश आणि व्हेग बोलतात, एखादा उडाणटप्पू बोलल्यासारखं हे बोलणं आहे. त्यांना हे शोभत नाही असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिलंय. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एका कार्यक्रमात सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत
सुषमा अंधारे म्हणाल्या, आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल. कधी रामदास कदम , कधी गुलाबराव पाटील कधी श्रीकांत शिंदे तर कधी एकनाथ शिंदे यांची बतावणी ऐकायला मिळेल.मात्र, आत्ता एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलं आहे. त्या बतावणीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, अशी उपरोधी टोला त्यांनी लगावला आहे.
राणे पिता-पुत्रांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
चिपळूणमध्ये राडा झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. "चिपळूण, गुहागरमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या संबंधाने जी काही घटना घडली. ती पाहाता मागच्या 8 ते 10 महिन्यांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि राणे पिता-पुत्रांनी उच्छाद मांडलाय. त्यामुळे कोणाचाही सहज प्रतिक्रिया आहे. मराठा समाजाबाबत नारायण राणे यांनी जी व्यक्त केली, ती उद्विग्न करणारी आहेत. राणे पिता-पुत्रांनी ही भाषा थांबवली नाही तर गुहागर येथील घटना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते", अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली होती.
राणे पिता-पुत्रांनी ही भाषा थांबवली नाही तर
जाणीवपूर्वक दोन समाजात - धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राणे कुटुंबिय करत आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया सहज आणि स्वाभाविक आहे उलट राणे पिता-पुत्रांनी ही भाषा थांबवली नाही तर गुहागर येथील घटना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते. तसेच गुहागर येथे घडलेली घटना ही एक प्रकारे पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या