कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांवरील हक्क अबाधित ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे दोनदिवसीय महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडले. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व नेत्यांचा ताफा कोल्हापुरात पोहोचला. महाअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप नेत्यांच्या अभिनंदनचे ठराव करण्यात आल्यानंतर आज (17 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनेच्या समारोप प्रसंगी भाषण केलं. त्यानंतर संध्याकाळी गांधी मैदानात जाहीर सभा पार पडली. 


यांना खोके नाही, तर कंटेनर लागतात. मला मारण्याचा सुद्धा कट होता, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला. 



हे आयत्या पिठावर रेगुट्या मारायला आले


वारसा सांगणाऱ्यांनी पहिल्यांदा आपला आरसा पहावा, बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नव्हे तर मनगटात मेहनत असावी लागते. शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र अनेक शिवसैनिकांकडून ठेवण्यात आले. हे आयत्या पिठावर रेगुट्या मारायला आले. मात्र, त्या सुद्धा त्यांना नीट मारता आल्या नाहीत, अशी सुद्धा टीका एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करताना आरोपांवर आरोप केले. दोन्ही भाषणांमध्ये संपूर्णतः रोख हा उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच केंद्रित राहिला. 50 कोटींची मागणी केली असता ते देण्यात आले, महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये गेल्यानंतर मोदींची भेट झाल्यानंतर घाम फुटला ते अमित शाहांशी मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झालीच नव्हती असे अनेक दाव्यांवर दावे केले. 


मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झालीच नाही 


गांधी मैदानामध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांशी मातोश्रीवरती बंद दाराआड कोणतीही चर्चा झालीच नव्हती असा मोठा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने मातोश्रीवर बंद खोलीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला होता आणि यानुसार भाजपकडे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आणि शिवसेनेकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असा प्लॅन ठरला होता असे सांगत भाजपला घेरलं आहे. मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा शब्द खोडून काढला. अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. 



मोदींना पाहताच ठाकरेंना घाम फुटला 


महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री एक उद्धव ठाकरे अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासमवेत पीएम मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते. दिल्लीमध्ये पीएम मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना घाम फुटला होता, असा दावाही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना केला. आपल्याला हा किस्सा अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले ते म्हणाले.


मागणी करताच 50 कोटी दिले 


उबाठा गटाकडून आम्हाला 50 कोटी मिळावे म्हणून पत्र पाठवण्यात आलं होतं. एका क्षणाच्या विचार न करता आम्ही ते देऊन टाकले. आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात. अरे मनाचे नाही, तर जनाची तरी तुम्हाला लाज वाटायला हवी, अशी टीका शिंदे यांनी केली. 


नारायण राणे आणि राज ठाकरेंचा काय त्रास होता?


एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनाच्या समारोपच्या भाषणात बोलताना नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा सुद्धा उल्लेख केला. त्यांनी नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा तुम्हाला काय त्रास होता? अशी विचारणा केली. एखादा चांगला भाषण करायला लागला की त्यांचे भाषण कट करू लागले होते. दोन-चार टाकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. मुघलांना जसे संताजी धनाजी दिसत होते, तसे आता आम्ही यांना दिसतो, अशी टीका त्यांनी केली.  


इतर महत्वाच्या बातम्या