Sushilkumar Shinde Birthday, अकलूज : देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून अकलूजमध्ये जंगी आयोनज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस अकलूजमध्ये करण्यात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोहिते पाटील कुटुंबिय सोलापूरच्या राजकारणात आक्रमकपणे सक्रिय झालं आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसासाठी दिग्गज खासदार आमदारांनी हजेरी लावली आहे. यावेळी शिंदे यांच्यावरील 'राजकारणातील 5 दशके सुशीलकुमार शिंदे' या पुस्तकाचे
प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अकलूजमधील कार्यक्रमासाठी कोणा कोणाची उपस्थिती
अकलूजमधील कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील मोहिते पाटील सांगलीचे खासदार विशाल पाटील , खासदार निलेश लंके , खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार नारायण पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील इत्यादी नेत्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धैर्यशील मोहिते पाटलांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर बोलले
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, हा सुसंस्कृतपणा ही राजकारणाची पद्धत नवीन पिढीला समजली पाहिजे. शिंदे साहेबांच्या वाढदिवसासारखा योगायोग नव्हता म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला. हा कार्यक्रम आयोजित केला. आम्हाला आजच्या कार्यक्रमातून विचार अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचवाया आहे. जे समाजकारण राजकारण मागे या जिल्ह्यामध्ये झालं, राज्यामध्ये झालं. हा विचार समतेचा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.
पाऊस असलेल्या भागातील पाणी दुष्काळाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आज सुद्धा पंढरपूरला दररोज रेल्वे नाही. दिवसा रेल्वे ती पण मुंबईवरून आहे. जर मराठवाड्यातल्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली मराठवाड्यातील जिथून डेली रेल्वे पंढरपूरला आली. विदर्भातून रेल्वे पंढरपूरला आली कोकणातून रेल्वे पंढरपूरला आली. विशाल दादा तुम्ही कोल्हापूर सांगली मार्गे खूप पंढरपूरला जर दररोज रेल्वे आणली आणि मुंबईतून रोज रेल्वे आली तर वारकऱ्यांची सोय होईल. विधानसभेनंतर आपले सरकार येणारच आहे, महाराष्ट्रात अनेक दुष्काळी तालुके आहे. आयआयटी लोकांना रिसर्च करून जादा पाऊस असलेल्या भागातील पाणी दुष्काळाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे.
इतर महत्त्वाच्या बातम्या