Sushilkumar Shinde on Praniti Shinde, Solapur : "देशात लोकशाही टिकवायची आहे की, हुकूमशाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रणिती सारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचा नावं दिल्लीत गाजवू द्या. प्रणिती ताईंच्या नावाचे बटन दाबून आपल्याला त्यांना लोकसभेत पाठवायचे आहे, असं आवाहन करत काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. ते सोलापुरातील एका सभेत बोलत होते. 


सुशील कुमार शिंदे म्हणाले, मला एकदा राज्यसभा, दोनदा लोकसभेच्या सभागृहात पाठवले.  मी एससी कॅटगिरीचा असताना मला ओपनच्या जागेवरून निवडून दिले. मात्र जागा राखीव झाल्यावर मला पाडले. असे कसे झाले माहिती नाही, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


अटलबिहारी वाजपेयी सज्जन पंतप्रधान होते 


पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, अटल बिहारी हे सज्जन पंतप्रधान होते, त्यांना देखील बाजूला सरण्याचे काम केलं. राम मंदिरमध्ये अडवाणी आणि यांनी राम मंदिर बनवण्यासाठी रथयात्रा काढली होती. भाजपा सत्तेत आली आणि जिथे तिथे आश्वासन देत सुटली. जी काम आम्ही केली त्याचं कामाचे उदघाटन हे करत सुटले, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी नमूद केलं. 


लोकशाही टिकवण्यासाठी प्रणिती शिंदेंना दिल्लीत पाठवा 


दक्षिण सोलापुरात सीआरपीएफचे ट्रेनिंग सेंटर, एसएसबीचे सेंटर हन्नूर येथे काम सुरु केलं. पण माझं मंत्रीपद गेलं त्यानंतर कोणीही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक तिथे पडून आहे, केवळ काँग्रेसने सुरुवात केली म्हणून हे लक्ष देत नाहीत. लोकशाही टिकवण्यासाठी आता तुम्हाला प्रणिती शिंदेच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना संसदेत पाठवायचं आहे. 


पाच वर्षात भाजपने काहीच काम केलं नाही 


भाजपने मागच्या दोन निवडणुकीत विजयी झाल्यावर देखील काहीही काम केलेलं नाही. त्यांच्याकडे सांगण्यासाठी देखील काहीही काम नाही. केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवली जाते, मात्र आता दूध का जला छाज भी फुक कर पिता है. पाच ही आमदार, खासदार भाजपचे आहेत, पण लोकांचा आवाज काँग्रेस आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. गोरगरीबांचा वाली आता काँग्रेस आहे, आणि या काँग्रेसचा आत्मा तुम्ही सगळे आहात. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला लढणे गरजेचे आहे, अन्यथा ही शेवटची निवडणूक असेल. रशियात पुतीनने सर्व विरोधकांना तुरुंगात टाकलं उरलेल्या लोकांना तडीपार केलं. आपण जर नाही लढलो तरी उद्या भारतात ही हेच होईल, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो, तो भाजपला मदत करतो, प्रणिती शिंदेंचा 'वंचित'वर हल्लाबोल