Loksabha Election 2024 : " सुजय विखे-पाटलांची मतं ही अनेक वर्षांच्या काँग्रेसच्या पुण्याईमुळे आहेत. तरीही सुजय विखे-पाटलांना (Sujay Vikhe Patil) ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. मी आत्ताच खात्रीने सांगते की, सुजय विखे-पाटील तेथून निवडून येणार नाहीत. सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) जागेचा जो विषय आहे. ते अगदी मी खेळकर पद्धतीने सांगते. मी राज्यशास्त्राची विद्यार्थ्यीनी म्हणून मांडते. तटकरेंची जागा जरी उभी केली तरीही भाजपने जो डाव आमच्या शिवसेनेसोबत केला होता, तशाच पद्धतीचा डाव ते अजितदादांविरोधात करतील. तटकरेंच्या विरोधात भाजप धैर्यशील पाटील किंवा इतर कोणाला बंडखोर म्हणून उभं करणार  आहेत. याचा परिणाम म्हणून लोक यांना मतं द्यायचे की नाही? याचा विचार करतील", असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) म्हणाल्या. एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेबाबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


भाजपच्या जागा वाढतात, टक्केवारी कमी होते


ओपिनियन पोलमध्ये भाजपची मताची टक्केवारी घटत आहे. यांच्या जागा वाढतात मात्र, भाजपची टक्केवारी कमी होते. महाराष्ट्रात जशी परिस्थिती आहे, तशीच इतर राज्यांमध्ये देखील आहे. उदाहरण द्यायचे झाले तर अशोक चव्हाण आहेत. त्यांची मतं ही काँग्रेसची मतं आहेत. ती जागा काँग्रेसची जागा आहे.


एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा ओपिनियन पोल काय सांगतो?


एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या ओपिनियन पोलनुसार, महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळणार आहेत. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षाला 22 जागा मिळतील. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून केवळ 6 जागा मिळतील, असा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. 


उद्धव ठाकरेंच्या किती जागा निवडून येणार?


ओपिनियन पोलनुसार, उद्धव ठाकरेंची मशाल धगधगणार असल्याचे चिन्ह आहेत. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष मिळून 16 जागा निवडून आणतील, असा अंदाज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


ABP Majha C Voter Opinion Poll : उद्धव ठाकरेंची मशाल धगधगणार, शिंदे आणि अजितदादांना दोघांना मिळून केवळ 6 जागाच मिळणार, एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा ओपिनियन पोल काय सांगतो?