Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा ओपिनियन पोल सध्या समोर आलाय. ओपिनियन पोलनुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असे दोन्ही पक्ष मिळून 16 जागा मिळणार असल्याचा अंदाज समोर आलाय. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागा विचार केला तर दोन्ही पक्षांना मिळून केवळ 6 जागा मिळणार असल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. ओपिनियन पोलनुसार, महाविकास आघाडीला 20 तर महायुतीला 28 जागा मिळणार असा अंदाज व्यक्त केला जातोय.
एकनाथ शिंदेंना मोठा फटका
सध्या अनेक विद्यमान खासदार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे शिंदेंकडे 18 खासदारांपैकी 12 पेक्षा जास्त खासदार आहेत. मात्र, आगामी लोकसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचे पक्ष मिळून केवळ 6 जागा निवडून आणतील, असा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदारांची मोठी संख्या असताना देखील निवडणुकीत मात्र, पदरी अपयशच पडताना दिसत आहे.
2019 मध्ये भाजप आणि काँग्रेला किती जागा मिळल्या?
भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 23 जागांवर विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणूकीत मात्र, भाजपची एक जागा घटण्याची शक्यता आहे. कारण पोलनुसार भाजपला 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेस पक्षाला 2019 च्या निवडणूकीत बाळू धानोरकर यांच्या रुपाने केवळ एक जागा जिंकता आली होती. आगामी निवडणूकीत मात्र, काँग्रेस 4 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज ओपिनियन पोलने वर्तवला आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत लढली होती. तेव्हा शिवसेनेत फुट पडली नव्हती.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची कामगिरी कशी होती?
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत बंड करणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना निवडणुकीत मोठा फटका बसताना दिसत आहे. कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या पक्षाच्या मिळून केवळ 6 जागा निवडून येतील, असा अंदाज ओपिनियन पोलने व्यक्त केला आहे. पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती मिळेल, असे बोलले जात होते. वास्तविक रुपानेही तसेच घडेल, असा अंदाज ओपिनियन पोलचा देखील आहे. 2019 मध्ये दोन्ही पक्ष फुटलेले नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या 18 तर राष्ट्रवादीच्या 4 जागा निवडून आल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या