Suresh Dhas, Beed : दुध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा. जसं वाळू माफिया आणि गुटखा माफियावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा समावेश केला तसाच दुध माफीया आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी. हा निर्णय आगामी कॅबिनेट किंवा पुढच्या कॅबिनेट मध्येच घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे माजी मंत्री सुरेश धस यांनी सांगितले. ते बीडमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. 


भेसळखोरांना आता गावकऱ्यांनी 'विष कालवे ही पदवी बहाल करावी 


सुरेश धस म्हणाले,  दुग्धविकास मंत्र्‍यांनाही याबाबतची मागणी करणार आहे. अशा भेसळखोरांना आता गावकऱ्यांनी 'विष कालवे ही पदवी बहाल करावी असा उपरोधिक टोला माजी मंत्री सुरेश धस यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असंही सरेश धस यांनी सांगितले. 


अजित पवारही दुध भेसळखोरांना मोक्का लावण्याच्या भूमिकेत 


दुध भेसळ करणार आहे, हे सिद्ध झालं. त्याने भेसळ केलेली असेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी, इथपर्यंतचा आम्ही कायदा करणार होतो. आता भेसळीसंदर्भातील कायदा त्याठिकाणी कडक करणार आहोत. आम्ही अध्यादेश काढतोय. दुधात भेसळ करणारी व्यक्त सापडली तर आम्ही त्याला मोक्का लावणार आहोत", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुधात भेसळ करणाऱ्या लोकांना तंबी दिली होती. बारामतीतील सांगवी येथे केलेल्या भाषणात त्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर सुरेश धस यांनीही दुध भेसळखोरांच्या विरोधात मोक्का लावावा, अशी मागणी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray vs Maratha Protest : राज ठाकरे अन् मराठा आंदोलकातील वाद थांबता थांबेना,धाराशिवमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला,पोलिसांची माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की