Supriya Sule on NCP Office Lavani Dance Controversy: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नागपूर (Nagpur) येथील कार्यालयात झालेल्या लावणी सादरीकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात एका महिला कार्यकर्तीला लावणी सादर करताना पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी ‘दिवाळी मिलन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमादरम्यान पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने दोन गाण्यांवर लावणी सादर केली. कार्यक्रमाच्या वेळी पक्षाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणे कितपत योग्य? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


Supriya Sule on NCP Office Lavani Dance Controversy: काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे. हे खूप दुर्दैवी आहे. त्या कुटुंबात देखील आम्ही होतो. तुम्ही शरद पवारांकडून (Sharad Pawar) अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष काढून घेतला. हा पक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. तिथे असे प्रकार करणे अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


Praful Patel on NCP Office Lavani Dance Controversy: लावणी डान्स प्रकरणाची प्रफुल्ल पटेलांकडून दखल 


दरम्यान, नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील लावणी डान्स कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या वादानंतर खासदार प्रफुल्ल प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले असून संबंधित प्रकार हा निषेधार्ह आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 



आणखी वाचा 


Pune Old Lady On Supriya Sule: 'टीव्हीवर दहा मिनिटांचा कार्यक्रम, बाकीची वीस मिनिटं जाहिरातीच...'; पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार


सुनील तटकरेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं; शिंदेंच्या आमदाराला थेट इशारा, हिशोब कधी चुकता करायचा ते चांगलं माहिती