Prakash Solanke : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांमुळे बदनामी झाली असं म्हणतात. तर ते बीडचे (Beed) चार-पाच पुढारी कोण? याबाबत धनंजय मुंडे यांनी नाव घेऊन बोलायला पाहिजे. ते जर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणाबाबत बोलत असतील तर ते विधानसभेत जाहीरपणाने मांडणं म्हणजे बदनामी नाही. हे हत्याकांड कुणी घडून आणलं, त्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे, ही आमची मागणी होती. आरोपी पकडले गेले. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीसाठी केली गेली. खंडणी मागणीची ताकद कोणाची होती? खंडणी कोण मागत होता? याबाबतही स्पष्टीकरण द्यावे. असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडच्या माजलगाव मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.

Continues below advertisement


Prakash Solanke :  जी बदनामी झाली ती बदनामी नाही, तर जिल्ह्याची वस्तुस्थिती


कुणीही जातीवर कुणाला बदनाम केलेले नाही, समाज म्हणून आम्ही कधी टीका केली नाही. तर आरोपीवर टीका केलेली आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याचा कारभार ज्याप्रकारे हाकला. संपूर्ण अधिकार वाल्मीक कराड यांना देऊन टाकले. त्याची परिणीती त्या खुनात झाली. वाळूचे उत्खनन, राखीचे विक्री, असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते. हे काढलं म्हणजे बदनामी नाही. वाळूवर आमचे टिप्पर चालत होते का राखेवर आमचे ट्रक चालत होते? जी बदनामी झाली ती बदनामी नाही, तर जिल्ह्याची वस्तुस्थिती होती. आम्ही रस्त्यावर उतरल्यामुळे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली असेही आमदार प्रकाश सोळंके म्हणाले.


Prakash Solanke on Pankaja Munde : पंकजा मुंडे जाहीर पणाने सांगणार नाहीत, पण...


माझ्या मतदारसंघात रमेश आडसकर यांची उमेदवारी धनंजय मुंडे यांच्यामुळे, तर माधव निर्मळ यांची उमेदवारी पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्यामुळे आली. या प्रवेशामुळे माझ्या आरोपाची पुष्टी मिळत आहे. कारण आडसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर निर्मळ यांनी भाजप प्रवेश केला. पंकजा मुंडे जाहीर पणाने सांगणार नाहीत, पण त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी निर्मळ यांचे काम केलं. काही लोकांनी आडसकरांचं काम केलं, याबाबत मी वरिष्ठ पातळीवर बोललो आहे. पंकजा मुंडे यांनी युतीबाबत सांगितलेली वस्तुस्थिती आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत. असेही प्रकाश सोळंके म्हणाले.


Prakash Solanke on Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला असेल तर....


नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे युती झालेली आहे. आता ती कुणाला आवडू नको, युतीच्या बाबतीत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. प्रीतम मुंडे यांच्यावर नवीन जबाबदारी देणारच्या घोषणेचे मी स्वागत करतो. युती झाली तर आम्ही सोबत काम करू, युती नाही झाली तर प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. समाजामधील दरी मिटाव्यात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या यावर बोलताना त्यांनी जर जरांगे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला असेल तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी जरांगे पाटलाबाबत या विषयावर चर्चा करून समाजामधील दूही कशी मिटवण्यात येईल हे पहावे. या कामासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत असेही प्रकाश सोळंके म्हणाले.


ही बातमी वाचा: