Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...

Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. तर संतोष देशमुख प्रकरणावरून सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

Supriya Sule :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीड पालकमंत्री झाल्यानंतर आज गुरुवारी (दि. 30) पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. आज बीडमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आजची डीपीडीसीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार बीडमध्ये असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुप्रिया सुळे या थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. 

Continues below advertisement

सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, माझे सरकारला काही प्रश्न आहेत. गेली 51 दिवस अजूनही एक खुनी फरार आहे. बीडमध्ये हार्वेस्टर आणि पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत. याची आत्ताच्या कृषिमंत्र्यांनी कबुली केली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर हा घोटाळा कुठे कुठे झाला आहे? याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती सरकारने द्यावी. तसेच अंजली दमानियांनी केलेल्या आरोपावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे. या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? ते मी पाहणार आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर सरकार काय निर्णय घेणार? पिक आणि हार्वेस्टरबाबत आजच्या डीपीडीसीमध्ये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांची भेट 

सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. गेल्या 51 दिवसांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे?अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत. मी ही ट्विट करणार आहे. मी ही पार्लमेंटमध्ये हा विषय मांडणार आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंटमध्ये न्याय मागणार आहोत.  भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार आहे. तुमच्या महाराष्ट्रात काय आणि सुव्यवस्थेचे काय सुरु आहे, याची माहिती अमित शाहांना देणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा 

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. मात्र, ते राजीनामा का देत नाहीत? हे त्यांनाच विचारा. नैतिकतेवर राजीनामा झाला पाहिजे. आम्ही सगळे अंजली दमानिया, बजरंग सोनवणे, बीडमधील सर्व आमदार हेच म्हणत आहेत, असे सुपिया सुळे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola