Vastu Tips : अनेकदा आपण पाहिलं असेल की, आपल्या घराच्या खिडकीत, छतावर किंवा खिडकीच्या कोपऱ्यात कबूतर (Pigeon) आपलं घरटं बनवतात. काही लोक याला शुभ संकेत मानतात तर काहींसाठी हा अशुभ संकेत ठरतो. वास्तूशास्त्रानुसार, घरात कबूतर येणं शुभ मानलं जातं. पण, जर कबुतरांनी आपल्या खिडकीत घरटं बनवलं तर याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वास्तूशास्त्रानुसार, असं म्हणतात की, यामुळे घरात धनाची कमतरता भासते आणि संकटांची वाढ होते. तर, काही मान्यतेनुसार, हा देवी लक्ष्मीच्या कृपेचा संकेत देखील असू शकतो. त्यामुळे कबुतराचं घरात घरटं बनवणं शुभ की अशुभ आहे ते जाणून घेऊयात.
आर्थिक तंगीचा संकेत
जर तुमच्या घरात कबूतर वारंवार घरटं बनवत असतील तर हा शुभ संकेत मानला जात नाही. असं म्हणतात की, ज्या ठिकाणी कबुतरांचं घरटं असतं त्या ठिकाणी आर्थिक तंगी येऊ शकते. तसेच, घरातील बरकत देखील कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला घरात कबुतराचं घरटं दिसलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढा.
सुख-समृद्धीत अडथळा
कबुतरांनी घरात घरटं बनवल्यामुळे घरात दुर्गंधी वाढते. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच, प्रगतीत अडथळा निर्माण होतो. तसेच, आपल्या सुख-समृद्धीत वाढ होत नाही.
आजाराला आमंत्रण
कबुतरांच्या पंखांनी आणि दुर्गंधीने अनेक प्रकारचे आजार पसरु शकतात. यामुळे श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो. तसेच, एलर्जी आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे कबुतरांना घरात घरटं बनवू देऊ नका.
काही लोक शुभ मानतात
मात्र, असं असलं तरीही काही ठिकाणी हे शुभ मानलं जातं. काही लोकांच्या मान्यतेनुसार, कबूतर देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. त्यामुळे ते घरी आल्याने बरकत वाढते. तसेच, देवी लक्ष्मीची कृपा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: