Sanjay Kute on Supriya Sule : " शिंदेजी तुमचे बैर नही देवेंद्र तेरी खैर नही!" अशी टॅगलाईन वापरत राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रवक्त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर भाजप नेते आ. संजय कुटे यांनी चांगलाच पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे या राज्याच्या सो कॉल्ड नेत्या असून त्यांनी असं वक्तव्य करून त्यांची जातीयवादी मानसिकता दाखवून दिली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार संजय कुटे यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


लोकाभिमुख काम केल्याने जनतेनेच महायुतीचा मेगा प्लॅन ठरवला 


संजय कुटे म्हणाले, लोकाभिमुख काम केल्याने जनतेनेच महायुतीचा मेगा प्लॅन ठरवला आहे. नितीन गडकरी यांनी राज्यात प्रचार केल्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यांचा आम्हाला मोठा फायदा होणार आहे. सुप्रिया सुळे या सो कॉल्ड नेत्या आहेत. त्यांची शिदोरी फक्त त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची जातीयवादी मानसिकता समोर आली आहे. शरद पवार यांनी जसं त्यांना शिकवलं तसं त्या बोलतात. मात्र याचा देवेंद्रजींवर कुठलाही परिणाम होणार नाही. खालच्या दर्जच्या राजकारणाला देवेंद्रजी विकासातून उत्तर देतील.


आजकाल विरोधकांची टीका म्हणजे मजाक आणि हसण्याचा विषय 


पुढे बोलताना संजय कुटे म्हणाले, आजकाल विरोधकांची टीका म्हणजे मजाक आणि हसण्याचा विषय आहे. नेहमी खोटं बोलणारे देशाच्या एजन्सीला खोटं ठरवतात. यांना खोटं बोलण्याची कावीळ झाली आहे. महायुतीत लाडकी बहीण योजनेबद्दल कुठलेही मतभेद नाहीत. SOP मुळे काही लोकांची फसवणुकीची मानसिकता असते त्याला आळा बसेल. पोलीस दलावर बोलताना नेत्यांनी त्यांचा आदर होईल असच बोलावं . आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही राबवलेल्या लोक अभिमुख योजनेच्या आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत . आमच्यापुढे आव्हान नसून माहविकास आघाडी समोर आव्हान आहेत.


सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या  होत्या?


'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही', अशी टॅगलाईन देत खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरला होता, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये, असंही सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली होती. यावेळी त्यांनी प्रवक्त्यांना सूचना दिल्या होत्या.


इतर महत्वाच्या बातम्या


Devendra Fadnavis : अजितदादांसोबत नॅचरल युती नव्हती, राजकीय युती, पुढील काही वर्षात ती नॅचरल होईल : देवेंद्र फडणवीस