Supriya Sule on Devendra Fadnavis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. 'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही', अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरलाय, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये, असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुळेंनी पुढील रणनितीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले आहे. 


लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे विधानसभेसाठी सक्रिय 


लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. शिवाय शरद पवारांच्या पक्षाने 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर सुप्रिया सुळेंसह पक्षातील इतर सहकाऱ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. सुप्रिया सुळे विधानसभा निवडणुकीसाठीही अॅक्टिव्ह मोडवर आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून तगडे उमेदवार हेरत आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. सुप्रिया सुळेंनी मराठावाड, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जात प्रचार सुरु केला आहे. 


मुश्रीफांविरोधात पवारांकडून समरजित घाटगेंना बळ, हर्षवर्धन पाटीलही तुतारी फुंकण्याच्या तयारीत 


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कागलचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर शरद पवारही कागलमध्ये तगड्या उमेदवाराच्या शोधात होते. महायुतीत विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा पॅटर्न ठरलेला आहे. त्यामुळे महायुतीकडून हसन मुश्रीफांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. दरम्यान, हाच डाव पवारांनी हेरला त्यांनी ठीक हसन मुश्रीफांचे विरोधक आणि भाजप नेते समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात खेचले. पक्षात खेचलेच नाही तर मुश्रीफांविरोधात सभा घेत समरजीत यांना मंत्री करु, अशा शब्दही कागलमधील जनतेला दिला. दुसरीकडे इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांनी देखील अजितदांदासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कागलप्रमाणेच इंदापूरमध्ये महायुतीत संघर्ष निर्माण झालाय. त्यामुळे इंदापूरमध्येही शरद पवार राज्यातील दिग्गज नेते असलेल्या हर्षवर्धन पाटलांना आपल्या पक्षात खेचतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 


सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांसोबत बैठक


शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही अशी टॅग लाईन देत आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असल्याचे सुप्रिया सुळेंचे प्रवक्त्यांना आदेश


तसेच मनोज जरांगेवर कोणीही टीका करु नये असेही आदेश सुळेंनी दिलेत


इतर महत्वाच्या बातम्या 


Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींवरुन महायुतीतील भावांचे एकमेकांना चिमटे, सीएम शिंदे धनंजय मुंडेंना म्हणाले, मुख्यमंत्री शब्द का वापरला जात नाही?