मुंबई:  महाराष्ट्रातल्या राजकारणात नोव्हेंबर 2019  साली पहाटे झालेला शपथविधी कुणीही विसरणार नाही.  अजित पवारांचा (Ajit Pawar) पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती या शपथविधीनंतर अनेक खुलासे कालांतराने समोर आले. परंतु या शपथविधीविषयीचा आतापर्यंत सर्वात मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एबीपीच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात केला आहे. अजित पवारांनी 2019 साली भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला कारण  शरद पवारांबद्दलचं काँग्रेस नेत्यांचे वाक्य मनाला लागलं आणि त्याची परिणीती सकाळचा शपथ विधी आहे, असे तटकरे म्हणाले.


सुनिल तटकरे म्हणाले,   2019 ला भाजप आणि शिवसेनेचे सरकार होत नाही हे समोर आल्यानंतर आम्ही त्यामध्ये आलो.   आमची दोन्हीकडे चर्चा सुरू होती . भाजप, शिवसेना- काँग्रेसबरोबर चर्चा सुरू त्यातून महाविकास आघाडी आली.  तो पहाटेचा नाही सकाळी 8 चा शपथविधी होता. त्याला देखील काही कारणे होती.  दिल्लीत ठरलं त्या संदर्भात मुंबईला नेहरु सेंटरमध्ये  एक बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून पवारांच्या विश्वासहार्तेसंदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. अहमद पटेल आज हयात नाहीत,  मल्लिकार्जुन खर्गे आज आहेत, इतरही नेते त्यावेळी होते. उद्धव ठाकरे देखील त्यावेळी होते . आम्ही सर्वजण होतो. त्यावेळी आमच्या मनाला वेदना झाल्या आणि त्याची परिणीती अजित दादांच्या शपथविधीमध्ये झाली, ते सरकार टिकले नाही.  


अजित पवारांना मुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार 15 दिवस टिकले नसते : सुनिल तटकरे


 राष्ट्रपती राजवट लागणे,  दिल्लीत भाजप बरोबर बैठका याबाबतीत अजित पवारांनी आणि प्रफुल पटेलांनी अनेक खुलासे केले आहेत.पण त्या साऱ्याची परिणीती अजित दादांच्या शपथविधीमध्ये झाली, ते सरकार टिकले नाही. काही जण म्हणतात, अजित दादांना उपमुख्यमंत्री केले ती चूक झाली. जर  अजित पवारांना मुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार 15 दिवस टिकले नसते, असा ठाम दावा मी करतो. सिक्रेट बॅलेट आले असते आणि पहिल्या दिवशी सरकार गेले असते, असे सुनिल तटकरे म्हणाले. 


शिवसेना बाहेर पडल्यावर आम्ही आत येणार अशी 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका : सुनील तटकरे


2017 साली आम्ही भाजपसोबत जाण्यची तयारी केली आहे.  त्यानंतर आम्ही अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली. पितृपक्षाच्या आत सरकारमध्ये कधी जायचे एवढाच निर्णय घेण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो.  प्रस्ताव सांगितल्यानंतर अमित शाह म्हणाले, शिवसेना आमच्यासोबत राहणार.. आम्हाला अपेक्षीत होते की ते शिवसेनेला काढतील पण त्यांनी ठाम नकार दिला. ते म्हणाले, अडवाणी, वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीए तयार केले आहे. आम्ही शिवसेनेला बाहेर जा असे सांगणार नाही. तुम्ही आल्यानंतर शिवसेना बाहेर गेली तर आमची हरकत नसेल. पण आम्हाला ते पसंत नव्हते. तरी आम्ही महिना- दीड महिना वाट पाहिली पण आमच्या भूमिकेप्रमाणे शिवसेनेला बाहेर जाण्यास सांगतात का? पण तसे घडले नाही. शिवसेना बाहेर पडल्यावर आम्ही आत येणार अशी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती. त्यानंतर 2019 च्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका आम्ही विरोधात लढलो. 


Video :



हे ही वाचा :


मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट