छत्रपती संभाजीनगर : 'बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असा महायुतीला विश्वास आहे,' असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) उमेदवारीचे सूतोवाच दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत होईल, अशी चर्चा सुरू असताना चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य केले आहेत. त्यामुळं ननंद-भावजय लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब झालाय, असंच म्हणावं लागेल. लोणावळ्यात "रन फॉर नेशन, रन फॉर मोदी" मॅरेथॉनला चित्रा वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला, यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यामुळे महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असतानाच 'बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असा महायुतीला विश्वास आहे,' असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.
स्टेट्सवरून उमेदवारी जाहीर?
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाच सामना होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहेत. मात्र, महायुती किंवा महाविकास आघाडीकडून याबाबत अधिकृत कोणतेही घोषणा झाली नाहीत. पण तरीही दोनही गटाकडून वेगवेगळ्या सोशल मीडियावर स्टेट्सवरून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून आपली तुतारी निशाणी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून स्टेट्स ठेवण्यात येत आहेत.
बारामती मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहणार....
आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची असणार आहे. कारण राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यात हा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याने राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात याची चर्चा होत आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या या दोन्ही उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :