चंद्रपूर : एकीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी मारामारी सुरू असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी (Chandrapur Lok Sabha Election) पक्षाने माझं नाव सुचवलं आहे, मात्र माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी स्वतः पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूरसाठी माझं नाव पक्षाने सुचवलं आहे, पक्ष आग्रह करतोय. मात्र मी प्रयत्न करतोय की माझी तिकीट कापली गेली पाहिजे. वरिष्ठांची इच्छा आहे की मी दिल्लीत यावं. पण माझा राज्यात जास्त उपयोग होईल असं मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.
ही बातमी वाचा: